तरुण भारत

दाऊद कराचीतच; पाकिस्तान सरकारची कबुली

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराची शहरात राहत असल्याची अप्रत्यक्ष कबुली पाकिस्तान सरकारने दिली आहे. त्यामुळे पाकचा खोटेपणा आता जगासमोर आला आहे. 

पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर निर्बंध लादले आहेत. आर्थिक निर्बंध लादण्याची नामुष्की ओढवलेल्या पाकिस्तानला दाऊदचा पत्ता उघड करावा लागला आहे. त्यामुळे दाऊद पाकिस्तानच्या कराची शहरात राहत असल्याचे स्पष्ट झाले.

पॅरिसमधल्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने जून 2018 मध्ये पाकिस्तानचा समावेश ‘ग्रे लिस्ट’ मध्ये केला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानला IMF आणि वर्ल्ड बँककडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर आणि इतर देशांसोबतच्या व्यापार संबंधांवर होऊ शकतो. कर्जबाजारी पाकिस्तानने या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी देशातील 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर निर्बंध लादले आहेत. 

पाकिस्तान सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या यादीत दाऊद इब्राहिमचा कराचीतला पत्ता ‘व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन’ असा देण्यात आला आहे. कराचीमध्ये त्याची तीन घरे असल्याचे पाकिस्तान सरकारने नमूद केले आहे. दरम्यान, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आरोप अनेकदा भारताने केले होते. हे आरोप पाकने नेहमीच फेटाळून लावले होते. आता मात्र पाकचा खोटेपणा जगापुढे उघड झाला आहे.

Related Stories

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 22 टक्के, गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे 

prashant_c

‘हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत’

triratna

शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

triratna

राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

अफगाण-तालिबान शांतता चर्चेला प्रारंभ

Patil_p

कोल्हापूर : दुपारपर्यंत 80 कोरोना बाधितांची भर, शहरातील 60 जण

triratna
error: Content is protected !!