तरुण भारत

पाकिस्तानचा यू-टर्न; दाऊद पाकिस्तानात नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराची शहरात राहत असल्याची अप्रत्यक्ष कबुली पाकिस्तान सरकारने दिली होती. मात्र, 24 तासातच पाकने यू-टर्न घेत दाऊद पाकिस्तानमध्ये वास्तव्यास नसल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. 

Advertisements

पाकिस्तान सरकारने देशातील 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर निर्बंध लादले आहेत. आर्थिक निर्बंध लादण्याची नामुष्की ओढवलेल्या पाकिस्तानला दाऊदचा पत्ता उघड करावा लागला आहे. त्यामुळे दाऊद पाकिस्तानच्या कराची शहरात राहत असल्याचे स्पष्ट झाले, असे वृत्त भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. 

पॅरिसमधल्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने जून 2018 मध्ये पाकिस्तानचा समावेश ‘ग्रे लिस्ट’ मध्ये केला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानला IMF आणि वर्ल्ड बँककडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर आणि इतर देशांसोबतच्या व्यापार संबंधांवर होऊ शकतो. कर्जबाजारी पाकिस्तानने या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी देशातील 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर निर्बंध लादले आहेत. 

पाकिस्तान सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या यादीत दाऊद इब्राहिमचा कराचीतला पत्ता ‘व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन’ असा देण्यात आला आहे. कराचीमध्ये त्याची तीन घरे असल्याचे पाकिस्तान सरकारने नमूद केले आहे. मात्र, हे वृत्त पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आहे.

Related Stories

डॉ. हर्षवर्धन आज स्वीकारणार WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे

datta jadhav

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक

datta jadhav

परराज्यातून घरी परतणाऱ्या बिहारी मजुरांचा खर्च बिहार सरकार करणार : नितीश कुमार

Rohan_P

अफगाणमध्ये स्फोटात 30 दहशतवाद्यांचा मृत्यू

Patil_p

भुजबळांच्या नावे पुन्हा धमकीचे फोन

Abhijeet Shinde

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!