तरुण भारत

सोलापूर : मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

सोलापूर : प्रतिनिधी

हाताला मार लागल्याने उपचारासाठी आशाबाई महादेव कांबळे यांना नातेवाईकांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी दाखल केले होते. परंतु त्यांच्यावर दुपारपर्यंत कोणतेही उपचार केले नाहित. परिणामी वेळेवर उपचार न झाल्याने त्यांचे रविवारी दुपारी निधन झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. तसेच संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करावी, मृत्यूचे नेमके कारण सांगावे, अशी मागणी नातेवाईक अशोक मस्के यांनी केली.

आशाबाई महादेव कांबळे यांच्या हाताला मार लागल्याने त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान दाखल केले होते. नियमानुसार ओपीडीमध्ये जाऊन केस पेपर काढून उपचारासाठी 17 नंबर व इतर विभागात नातेवाईक घेऊन गेले. विविध चाचण्या केल्या. कोरोनाचीदेखील चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. पुन्हा त्याच विविध ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णास घेऊन जाण्यास सांगितले. परंतु कोठेच उपचार केले गेले नाहित. दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यास ए ब्लॉक येथील कोरोना वॉर्डात दाखल केले. त्यानंतर रूग्ण दगावल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.
यादरम्यान रुग्णावर सकाळपासून ते दुपारपर्यंत कोणतेच उपचार केले गेले नाहीत. परिणामी रूग्ण दगावल्याचे नातेवाईक अशोक मस्के यांनी सांगितले. त्यामुळे यातील उपचार न करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे म्हणत नातेवाईकांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

प्रकरणातील माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ

उपचारासाठी रूग्ण वेळेवर सिव्हीलमध्ये आणल्यास असे घडणार नाहि. येथील डॉक्टर व सर्वजण मार्चपासून कोरोना काळात चांगली सेवा बजावत आहेत. परंतु या प्रकरणातील माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.
-डॉ. एस. ए. जयस्वाल, प्रभारी अधिष्ठाता

Related Stories

दिलासादायक : सोलापूर ग्रामीणमध्ये ७०७ कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सोलापूर : एसटीची दुचाकीस्वारास समोरुन धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

Abhijeet Shinde

कंटेनरची वाहनांना धडक; अपघातात तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

माढा तालुक्यात सोमवारी नवे १५ कोरोना बाधित

Abhijeet Shinde

रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, कामगारांचे काम बंद आंदोलन

Abhijeet Shinde

‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी धावले तहसीलदार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!