तरुण भारत

कॅलीस, झहीर अब्बास, स्थळेकर यांचा आयसीसी हॉल फेममध्ये समावेश

वृत्तसंस्था/ दुबई

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्वीस कॅलीस, पाकचा दर्जेदार फलंदाज झहीर अब्बास तसेच पुण्यात जन्मलेली आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेली आस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

Advertisements

जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये कॅलीस, झहीर अब्बास आणि महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकर यांची कामगिरी तसेच योगदान महत्त्वाचे असल्याने आयसीसीतर्फे त्यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव करण्यात आला आहे. क्रिकेट क्षेत्रात हे तिन्ही क्रिकेटपटू उत्तम दर्जाचे अष्टपैलू म्हणून ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेच्या कॅलीसने 1995 ते 2014 या कालावधीत 166 कसोटी, 328 वनडे आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 13,289 तर वनडेत 11579 धावा जमविल्या आहेत. कॅलीसने गोलंदाजी करताना कसोटीत 292 तर वनडेत 273 गडी बाद केले आहेत.

पाकच्या झहीर अब्बासला एशियन ब्रॅडमन म्हणून ओळखले जाते. त्याने 78 कसोटी आणि 62 वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे 5062 आणि 2572 धावा जमविल्या आहेत. क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात झहीर अब्बासने 40 धावांची सरासरी फलंदाजीत राखली होती.

ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 8 कसोटी, 125 वनडे आणि 54 टी-20 सामने खेळले आहेत. कोरोना महामारी समस्येमुळे आयसीसीने हॉल ऑफ फेम समारंभ केवळ औपचारिकता म्हणून पार पाडला. या समारंभाला कॅलीस तसेच दक्ष्णि आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक, भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर तसेच आयसीसीचे काही अधिकारी उपस्थित होते. 2009 साली आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सुनील गावसकर यांचा समावेश करण्यात आला होता.

Related Stories

आरबीआय पतधोरण आज जाहीर होणार

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी एस.एस.दास

Patil_p

लोकसभेत भाजप-काँग्रेसचे नेते भिडले

Patil_p

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Rohan_P

हॉकी इंडियातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण

Patil_p

तालिबानकडून अफगाण क्रिकेटच्या कार्यकारी संचालकाची हकालपट्टी

Patil_p
error: Content is protected !!