तरुण भारत

दोन दिवसांत 647 जण झाले कोरोनामुक्त

458 नवे रुग्ण, आठ जणांचा मृत्यू, बेळगाव तालुक्मयातील 137 जणांचा समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

शनिवारी व रविवारी दोन दिवसांत 647 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे तर गेल्या 48 तासांमध्ये 458 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या बाधितांत बेळगाव तालुक्मयातील 137 जणांचा समावेश आहे.

शनिवारी गणेशचतुर्थी दिवशी जिल्हय़ातील 368 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी ही संख्या थोडय़ा प्रमाणात कमी झाली आहे. 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन्ही दिवशी प्रत्येकी चार असे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 511 जण तर रविवारी 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार घेणाऱया 647 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठविण्यात आले. रविवारी बाधितांची संख्या कमी होती. त्यामुळे जिल्हय़ाला थोडा दिलासा मिळाला आहे. एकूण बाधितांची संख्या 9 हजार 943 वर पोहोचली असून यापैकी 5 हजार 851 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. 3 हजार 936 जणांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

28 हजार 355 जण होम केअरमध्ये

जिल्हय़ातील आणखी 1558 जणांचे अहवाल यायचे आहेत. रविवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 28 हजार 355 जण होम केअरमध्ये आहेत. आतापर्यंत 77 हजार 686 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 65 हजार 271 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कुवेंपूनगर, हनुमाननगर, वडगाव, महांतेशनगर, टिळकवाडी, नेहरूनगर, धामणे, हुदली, हिरेबागेवाडी, हुंचेनहट्टी, मुत्नाळ, टीव्ही सेंटर, अळवण गल्ली शहापूर, अनगोळ, कोनवाळ गल्ली, भाग्यनगर, महाद्वार रोड, हिंदवाडी, चव्हाट गल्ली, कणबर्गी, खडक गल्ली, मण्णूर, पिरनवाडी, येळ्ळूर, काकती, के. के. कोप्प, मोदगा, सुळगा हिंडलगा, शिंदोळी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीनगर, लक्ष्मी टेकडी, खासबाग, बॉक्साईट रोड, सहय़ाद्रीनगर, भांदूर गल्ली अनगोळ, रामतीर्थनगर, शिवबसवनगर, रेलनगर, अयोध्यानगर, मराठा कॉलनी, शेट्टी गल्ली, सदाशिवनगर, कल्याणनगर, विनायकनगर, विश्वेश्वरय्यानगर, आझमनगर, न्यू गांधीनगर, वैभवनगर, न्यू गुड्सशेड रोड, वडगाव परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

डॉक्टर, पोलिसांना लागण सुरूच

बेळगाव शहर व जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकातील पोलीस व सरकारी व खासगी डॉक्टरांना कोरोनाची लागण सुरूच आहे. दोन दिवसांत पाच डॉक्टर, दहाहून अधिक वैद्यकीय कर्मचारी, आठ पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

चोरुन दारूविक्री करणारे दुकान सील

Patil_p

बेळगावमध्ये 30 सार्वजनिक गणेशमूर्ती शिल्लक

Patil_p

मटका अड्डय़ांवर छापे,सहा जणांना अटक

Rohan_P

कार पुलावरून कोसळून प्राध्यापक ठार

Amit Kulkarni

मनपा मतदार याद्यांचे काम अंतिम टप्यात

Patil_p

फिरगण्णवर दाम्पत्य यजमान पदाचे मानकरी

Patil_p
error: Content is protected !!