तरुण भारत

‘या’ विमानतळाला मिळाली ‘इंटरनॅशनल कुरिअर हब’ची मान्यता

ऑनलाईन टीम / नाशिक : 

नाशिकजवळच्या ओझर विमानतळाला केंद्र सरकारने ‘इंटरनॅशनल कुरिअर हब’ची मान्यता दिली आहे. सहा महिन्यात ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

Advertisements

गोडसे म्हणाले, देशातील केवळ 13 विमानतळांवर इंटरनॅशनल कुरिअर सेवा उपलब्ध होती. त्यामुळे नाशिककरांना कुरिअरसाठी मुंबईला जावे लागत होते. ओझर विमानतळाला इंटरनॅशनल कुरिअर हबची मान्यता मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. केंद्र सरकारकडून नुकतेच या मान्यतेचे पत्र मिळाले.

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील पत्र काढले आहे. नाशिकमध्ये ट्रान्स्पोर्टेशन आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. ओझर विमानतळावर येत्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय हवाई कुरिअर सेवा सुरू होईल. दररोज एका विमानाने ही सेवा दिली जाणार आहे. त्याची क्षमता दहा टन असेल. ओझर हे राज्यातील दुसऱ्या आणि देशातील चौदाव्या क्रमांकाचे इंटरनॅशनल कुरिअर हब होईल, असेही गोडसे यांनी सांगितले. 

Related Stories

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत ‘एसओपी’ लागू करणार : अजित पवार

Rohan_P

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; निकाल पाहण्यात अडचणी

Abhijeet Shinde

न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

prashant_c

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन कोमात असल्याचा दावा

datta jadhav

हवेतून 10 मीटरपर्यंत पसरू शकतो विषाणू

Amit Kulkarni

न्यूझीलंड देश झाला कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!