तरुण भारत

कोल्हापूर : उद्योगपती शामराव चौगुले यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर

प्रसिद्ध उद्योगपती शामराव गणपत चौगुले (वय 86) यांचे कर्करोगाने निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी रविवारी सकाळी 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करवीर तालुक्यातील नांदगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शामराव चौगुले यांनी उद्योग क्षेत्रात नावलौकिक कमावला. भारतातील वाईन उद्योगाचे ते जनक होते.

Advertisements

पहिल्या भारतीय शॅम्पेनची निर्मिती त्यांनी केली. आज त्यांच्या वाईनचे ब्रँड अनेक देशात विकले जातात. आपल्या उद्योगामध्ये त्यांनी 1 हजारहून अधिक कुटुंबांना रोजगार दिला होता. ते शॅम्पेन इंडेज ग्रुपचे चेअरमन, ऑल इंडिया वाईन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष होते. तसेच कोल्हापुरातील हॉटेल शालिनी पॅलेसचे मालक होते. त्यांचे कोल्हापूरवासीयांचे व येथील अनेक संस्थांचे जिव्हाळ्य़ाचे संबंध होते. केंद्र सरकारच्या ग्रेप्स प्रोसिसिंग बोर्डाचे प्रथम संस्थापक अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. कोल्हापूर महापालिकेस त्यांनी गजलक्ष्मी हत्तीण भेट दिली होती. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Related Stories

पुलाची शिरोलीत वृध्द महिला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर भाजपचे पदाधिकारी मुंबईला रवाना

Abhijeet Shinde

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

Abhijeet Shinde

हातकणंगले बस स्थानकात परप्रांतीय कामगारांनी मांडला ठिय्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना मृत्यूमध्ये वाढ, 34 बळी, 1197 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मौजे आगर येथे युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!