तरुण भारत

हरियाणाचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / पंचकुला : 


हरियाणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट धक्कादायक आले आहेत. विधानसभेचे अध्यक्षच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. इंद्री येथील भाजपच्या आमदरांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर एमएलए हॉस्टल सेक्टर 3 च्या तीन कर्मचाऱ्यांना देखील कोरोना ची बाधा झाली आहे. 

Advertisements


26 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष आणि सरकार यांनी सुरक्षेच्यादृष्टीने सर्व आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान, विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनीदेखील स्वतः ची कोरोना चाचणी केली होती. रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले आहेत. 


याव्यतिरिक्त इंद्री येथील आमदार राम कुमार कश्यप यांचे रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष हो होम आयसोलेट झाले असून लवकरच त्यांची दुसरी चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान, रविवारी विधानसभा अध्यक्षांचे पीए आणि भाच्यासह 6 विधानसभा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 330 कर्मचाऱ्यांचे कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. 

Related Stories

पृथ्वीच्या दिशेने येतोय स्टेडियमएवढया आकाराचा लघुग्रह

datta jadhav

44 शिक्षकांचा राष्ट्रपतींकडून गौरव

Patil_p

गोमयापासून देवदेतांच्या मूर्ती

Patil_p

बंगाल हिंसाचार : मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई

Rohan_P

भूमीवाटप प्रकरणी जगन रेड्डी यांना समन्स

Patil_p

सोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेडंट

tarunbharat
error: Content is protected !!