तरुण भारत

सातारा : महावितरण साधणार व्हाट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे ग्राहकांशी संवाद

875 ग्रुपद्वारे सुमारे 2 लाख 18 हजार वीज ग्राहकांचा समावेश

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

महावितरणाने ग्राहक संवादासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जिह्यातील 875 गुपद्वारे सुमारे 2 लाख 18 हजार वीज ग्राहकांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याद्वारे सुमारे 18 लाख 37 हजार वीज ग्राहकांशी नियमित संवाद साधणार आहेत. पहिल्या टप्प्यात व्हॉट्अपचे सुमारे 7 हजार 350 गुप तयार करण्यात येत आहेत. अशी माहिती महावितरणाचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली आहे.

सातारा जिह्यात एका मंडल कार्यालयासह पाच विभाग, 24 उपविभाग आणि 130 शाखा कार्यालये आहेत. त्यासोबत प्रत्येक जनमित्रापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे गुप तयार करण्यात येत आहेत. पुणे प्रादेशिक विभागातील महत्त्वाच्या व मोठय़ा वीजग्राहकांसाठी प्रादेशिक विभाग स्तरावर प्रादेशिक संचालक, परिमंडल स्तरावर मुख्य अभियंत्यांकडून व्हॉट्अप गुपद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता ते शाखा अभियंते हे सर्व कार्यालयप्रमुख, तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनमित्रापर्यंत प्रत्येकी एक गुप तयार करण्यात येईल.

सुमारे 875 ग्रुपच्या माध्यमातून 2 लाख 18 हजार वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात येईल. या व्हॉट्अप ग्रुपमधील वीज ग्राहकांमध्ये उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील ग्राहक, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी, वाणिज्यिक संकुल पदाधिकारी, महत्त्वाचे ग्राहक, लघुउद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक वसाहत संघटना पदाधिकारी, एमआयडीसी वाहिन्यांवरील ग्राहकांचा समावेश रहील.

ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱया ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, वाडय़ा-वस्त्यांमधील काही ग्राहकांचाही समावेश असेल. या ग्रुपद्वारे विविध वीजपुरवठा बंद असल्याचे कारण व सुरू होण्याचा संभाव्य कलावधी, तसेच महावितरणच्या विविध ग्राहक सेवांची व वीज सुरक्षेबाबतची नियमितपणे माहिती दिली जाणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून प्राप्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व इतर विविध तक्रारीचे तत्परतेने निवारण करण्यात येईल.

Related Stories

कराडला १६ फेब्रुवारीला सायक्लेथॉन स्पर्धा

triratna

चौगुले स्मृती पुरस्कार कैलास स्मशानभूमीतील सेवकांना

Patil_p

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या आराखडय़ास मंजुरी

Patil_p

राहूल मर्ढेकर यांनी मलकापूर नगरपरिषदेचा कार्यभार स्विकारला

triratna

‘उत्पादन शुल्क’ झेपलंय का?

Omkar B

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱया 14 जणांवर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!