तरुण भारत

सातारा : नागठाणे भागात ४९ गावातील मंडळांचा ‘एक गाव एक गणपती’ला प्रतिसाद

बोरगाव पोलिस ठाण्याच्या आवाहनाला गणेश मंडळाचा प्रतिसाद

प्रतिनिधी / नागठाणे

Advertisements


कोरोना संसर्ग जिल्ह्यासह नागठाणे भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग गणेश उत्सव काळात वाढू नये यासाठी बोरगाव पोलिसांकडून ‘एक गाव -एक गणपती’ या उपक्रमासाठी गावोगावी जनजागृती करण्यात आली होती. या उपक्रमास बोरगाव पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या ५९ गावापैकी दहा गावांनी गणपती उत्सव रद्द केला असून उर्वरित ४९ गावांनी एक गाव एक गणपती या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू असले तरी दिवसेंदिवस बाधिताच्या संख्येत वाढ होत आहे. या वाढीत नागठाणे भागातील गावाची संख्येत लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. काही गावे हॉस्टस्पॉटच्या दिशेने जाण्याची भिती निर्माण झाली आहे. ही वाढ गणेश उत्सव आणखी वाढू नये यासाठी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा दिवसापासून जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला होता. पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गावात जाऊन सर्व मंडळे एकत्र करून त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शन केले जात होते.

संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने करावा, तसेच एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा असे आवाहन केले होते. या आवाहनास जी गावे प्रतिसाद देत होते तेथे लगेच उत्सवाचे ठिकाण निश्चित करत सर्वाना सहभागी करून उत्सव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमास प्रतिसाद दिल्याबद्दल प्रातानिधिक स्वरूपात सर्व मंडळाच्या अध्यक्षांना रोप देऊन सत्कार करण्यात आला होता. या उपक्रमात पोलिस ठाण्यातंर्गत ५९ गावापैकी दहा गावात उत्सव रद्द करण्यात आला असून ४९ गावात एक गाव एक गणपती हा प्रश्न राबविण्यात येत आहे. या उपक्रमाप्रमाणे पुढील काळात सोशल डिस्टसिंग ठेवत विसर्जनाचे नियोजन करावे असे आवाहनही बोरगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव गर्दी टाळण्यासाठी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गावात बैठका घेतल्या होत्या. यामध्ये सर्वानी प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम यशस्वी झाला आहे. – डॉ. सागर वाघ – सहायक पोलिस निरीक्षक, बोरगाव

Related Stories

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धुळीचे साम्राज्य

datta jadhav

सातारच्या आडत असोसिएशनच्या अध्यक्षास कोरोनाची बाधा

Patil_p

वडजलनजीक लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त; वनविभागाच्या पथकाने केली कारवाई

Abhijeet Shinde

सातारा शहर पोलीस ठाण्याची डीबी नव्या दमाची फौज

Patil_p

जावली अत्याचार प्रकरणातील आरोपींना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

datta jadhav

कराडचा अमिर शेख एक वर्षासाठी स्थानबद्ध

Patil_p
error: Content is protected !!