तरुण भारत

आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध रद्द

राज्य सरकारकडून सुधारित आदेश जारी : होमक्वारंटाईनसह सर्व नियम रद्द

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत आंतरराज्य प्रवेशासंबंधी नियमावली जारी करण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ जारी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारने सोमवारी आंतरराज्य प्रवाशांसंबंधीची सुधारित मार्गसूची जारी केली असून यापूर्वीचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आंतरराज्य प्रवासात  शिथिलता आली आहे.

परराज्यातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना यापूर्वी सेवासिंधू पोर्टलवर नोंदणी करावी लागत होती. आता तशी कोणतीही नोंदणी करावी लागणार नाही. राज्यातील सीमेवर, बसस्थानकांवर, रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर प्रवेशावेळी वैद्यकीय तपासणी केली जाणार नाही. केवळ थर्मर स्क्रिनिंग केली जाणार आहे. आंतरराज्य प्रवाशांना 14 दिवसांचे होम क्वारंटाईन करून त्यांची माहिती नोंदवून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. आता सुधारित मार्गसूचीनुसार हे कोणतेही नियम लागू होणार नाही. परिणामी परराज्यातून येणाऱयांना क्वारंटाईन होण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय परराज्यातून येणाऱयांचे वास्तव्य असलेल्या घरांना माहितीफलक लावणे, हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्याची पद्धतही रद्द करण्यात आली आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अप्पर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी सोमवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला आहे.

दरम्यान, कर्नाटकात येणाऱया परराज्यातील नागरिकांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. परराज्यातून कर्नाटकात आलेल्या व्यक्तीने आलेल्या दिवसापासून 14 दिवसांपर्यंत सर्दी, खोकला, ताप, घसा दुखी व कोरोनाची इतर लक्षणे आहेत का, याबाबत स्वयंनिरीक्षणाखाली रहावे. या 14 दिवसांच्या कालावधीत कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने स्वयं क्वारंटाईन होऊन डॉक्टरांकडून सल्ला घेणे किंवा आप्तमित्र हेल्पलाईन 14410 या क्रमांकाशी संपर्क साधावा. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सदर आदेश कर्नाटकात येणाऱया सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कामगार, प्रवासी, विद्यार्थी व इतर सर्वांसाठी लागू आहे.

Related Stories

प्रारुपानुसारच राम मंदिराची उभारणी

Patil_p

देशात दिवसभरात हजारहून अधिक बळी

Patil_p

राहुल गांधींचं मोदींना पत्र ; लसीकरणासंदर्भात केली ‘ही’ मागणी

triratna

‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे ऑगस्टपासून भारतात उत्पादन?

datta jadhav

दिलासादायक : दिल्लीत एका दिवसात 4,465 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

कोरोनामुक्तीचे प्रमाण देशात 96.91 टक्के

Patil_p
error: Content is protected !!