तरुण भारत

टॉप सीडेड टेनिसपटूंचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

येथे सुरू असलेल्या वेस्टर्न आणि सदर्न हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात रविवारी झेकची टॉप सीडेड टेनिसपटू प्लिसकोव्हा आणि द्वितीय मानांकित टेनिसपटू सोफिया केनीन यांचे आव्हान संपुष्टात आले. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.

रविवारी झालेल्या सामन्यात रशियाच्या व्हेरोनिका कुड्रेमेटोव्हाने प्लिसकोव्हाचा 7-5, 6-4 असा फडशा पाडत पुढील फेरी गाठली. दुसऱया एका सामन्यात फ्रान्सच्या कॉर्नेटने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम विजेती केनीनचा 6-1, 7-6 (7-5) असा पराभव केला. या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात  कॉर्नेटने अमेरिकेच्या मॅकनेलीचे आव्हान 6-0, 6-4 असे संपुष्टात आणले होते. जर्मनीच्या सिगमंडने झेकच्या व्होंड्रोसोव्हाचा 6-3, 6-7 (3-7), 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सिगमंडला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढेचाल मिळाली होती. इस्टोनियाच्या 12 व्या मानांकित कोंटावेटने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविताना रशियाच्या कॅसेटकिनाचा 6-3, 6-1 तसेच बेल्जियमच्या मर्टन्सने स्वीडनच्या पीटरसनचा 6-0, 6-2 असा पराभव केला.

Related Stories

हॅम्बुर्गच्या फुटबॉलपटूवर पाच सामन्यांची बंदी

Patil_p

रशियन डोपिंग निकालात लागण्याची शक्यता अंधुक : सेबॅस्टियन को

Patil_p

पाकचा उमर गुल निवृत्त

Patil_p

सिडनी कसोटीत धुराचा व्यत्यय शक्य

Patil_p

इंग्लंडच्या मालिका विजयात बटलरची चमक

Patil_p

मोहम्मद रकिप मुंबई सिटीशी करारबद्ध

Patil_p
error: Content is protected !!