तरुण भारत

‘कोविशिल्ड’च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला आजपासून प्रारंभ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला आजपासून भारतात सुरुवात होणार आहे. सिरमचे शासन व नियामक विषयांचे अतिरिक्त संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

कोरोना लसीच्या उत्पादनासाठी ऑक्सफर्डने भारतातील सिरम इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला 3 ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. 17 वेगवेगळ्या ठिकाणी या  चाचण्या होणार आहेत. 

आजपासून (दि.25) भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला प्रारंभ होणार आहे. तसेच दिल्लीतील एम्स, राजेंद्र मेमोरियल इन्स्टिट्यूट पाटणा, बी जे मेडिकल कॉलेज पुणे सह 17 ठिकाणी ही चाचणी घेण्यात येणार आहे. 18 वर्षावरील 1600 निरोगी नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत.

Related Stories

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक नक्षलवादी ठार

Abhijeet Shinde

‘अजितदादांनी माझे विचार रुजवण्यासाठी दौरे करावेत’

Abhijeet Shinde

ऍडमिरल हरि कुमार नवे नौदलप्रमुख

Patil_p

पंतप्रधानांकडून सरदारधाम भवनाचे उद्घाटन

Patil_p

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला अटक

Abhijeet Shinde

स्थापनादिनी खाली पडला काँग्रेसचा झेंडा

Patil_p
error: Content is protected !!