तरुण भारत

सोमवारी 437 कोरोनामुक्त चार बळी, 139 नवे बाधित

प्रतिनिधी / पणजी

सोमवारी कोरोनाने चार नवीन बळी घेतल्याने गोव्यात आजपर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 148 एवढी झाली असून 88 रुग्णांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. सोमवारी 139 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर 437 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14138 झाली असून त्यापैकी 10909 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 3081 जण कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

Advertisements

राज्यातील 133 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून विविध रेसिडेन्सी, हॉटेलमध्ये 31 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य खात्याकडून प्राप्त झाली आहे.

 सोमवारी चार जणांचे गेले बळी

मोंते हिल मडगाव येथील 50 वर्षीय रुग्ण, वास्को येथील 67 वर्षीय रुग्ण, बाळ्ळी येथील 50 वर्षीय, फातोर्डा मडगाव येदील 55 वर्षीय अशा एकूण 4 पुरुष रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागेले. या सर्वांनाच इतर प्रकारचे गंभीर आजार होते, असेही आरोग्य खात्याने नमूद केले आहे.

गोव्याबाहेरुन आलेले 9 जण पॉझिटिव्ह

गोव्यात विविध मार्गाने आलेल्या 9 जणांना कोरोनाची बाधा झाली असून एका प्रवाशाला होम क्वॉरंटाईन तर 6 प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 294 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. डिचोली 4, सांखळी 65, पेडणे 90, वाळपई 62, म्हापसा 134, पणजी 172, हळदोणा 60, बेतकी 58, कांदोळी 76, कासारवर्णे 37, कोलवाळ 90, खोर्ली 110, चिंबल, 146, शिवोली 51, पर्वरी 163, मये 29, कुडचडे 84, काणकोण 45, मडगाव 502, वास्को 250, बाळ्ळी 20, कासावली 120, चिंचिणी 38, कुठ्ठाळी 28, कुडतरी 69, लोटली 61, मडकई 45, केपे 91, सांगे 33, शिरोडा 45, धारबांदोडा 29, फेंडा 168, नावेली 97, प्रत्येक आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.


  • आतापर्यंतचे एकूण रुग्ण : 14138
  • आतापर्यंतचे बरे झालेले रुग्ण : 10909
  • आतापर्यंतचे सक्रीय रुग्ण : 3081
  • 24 ऑगस्टचे नवे रुग्ण : 139
  • 24 ऑगस्टला बरे झालेले रुग्ण : 437
  • 24 ऑगस्टला बळी गेलेले रुग्ण : 4
  • आतापर्यंतचे एकूण बळी : 148

Related Stories

दी गोवा कपिला मल्टिपर्पज पतसंस्था मांद्रे शाखेतर्फे मास्क प्रदान

Omkar B

बेंगलोरची ओडिशा एफसीशी बरोबरी

Amit Kulkarni

अटकेतील युवकाला जामिनावर सोडण्याचा आदेश

Omkar B

फोंडय़ात पन्नास कार्यकर्त्यांचा मगो प्रवेश

Patil_p

लॉकडाऊनच्या काळात फोंडा तालुक्यात 67 लाखांची दारु जप्त

Omkar B

मडगाव पालिकेत दिपाली सावळ यांचा विक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!