तरुण भारत

दान झालेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करणार : नगरसेवक किरण नकाते

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रत्येक प्रभागात कृत्रिम कुंडांची सोय केली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून संभाजीनगर व नेहरूनगर प्रभागातील नागरिकांसाठी नगरसेवक किरण नकाते व मैत्रीण फाउंडेशन यांच्या वतीने जमा केलेल्या सर्व गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे.

नगरसेवक नकाते म्हणाले, सद्यःस्थितीत सण असूनही आपणास काही गोष्टींची मर्यादा पाळावी लागणार आहे. यास्तव नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही जमा केलेल्या सर्व गणेशमूर्ती विधिवत विसर्जित करणार आहोत. सणाचे पावित्र्य जपत,भाविकांच्या भावनांचा आदर राखत व शासनाच्या सर्व नियमाचे पालन करत हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी घरीच गणेशमूर्ती टबमध्ये विसर्जित कराव्या. या मूर्तींचे संकलन करण्यासाठी आम्ही वाहनाची सोय केली आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : वीज बिल, घरफाळ्यात सवलत द्या

Abhijeet Shinde

जि. प. सदस्य प्रवीण माने यांचे निधन

Abhijeet Shinde

कसबा सांगाव येथे ३० एकरातील ऊस जळाला

Abhijeet Shinde

एक वारी अशीही

Abhijeet Shinde

एका शिक्षण संस्थेसह ११ शिक्षकांना डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

असळज येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा कुत्र्यावर हल्ला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!