तरुण भारत

कोल्हापूर : शिरोळमधील शतायु हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा तयार

प्रतिनिधी/शिरोळ

येथील शतायु हॉस्पिटल हे अल्पावधीतच लोकप्रिय हॉस्पिटल ठरले असून या परिसरातील रुग्णांना वरदायी ठरले आहे अन्य खाजगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी या कामी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

येथील शतायु हॉस्पिटल येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांच्यावर उपचार करण्याकरिता ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असे बेड व उपचारासाठी लागणारी सर्व यंत्रणा तयार करण्यात आली आहेत याचे उद्घाटन माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत डॉ विशाल चौगुले यांनी करून हॉस्पिटलच्या प्रगतीचा आढावा सांगितले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, क्रिटिकल रुग्णांच्यावर येथे उपचार होतील. हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

शतायु हॉस्पिटल मध्ये दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ ,गट विकास अधिकारी शंकर कवितके ,डॉ. राहुल खोत, डॉ सुशांत पाटील ,डॉ वीरेंद्र भोसले , डॉ कुलभूषण चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 26 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

पथदिव्यांसाठी इलेक्ट्रिक ऐवजी सोलरवरील हायमास्ट

Sumit Tambekar

पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच

Abhijeet Shinde

परिते येथे बिबट्याची भिती कायम; मोर लांडोरीची शिकार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’

Abhijeet Shinde

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!