तरुण भारत

लडाख सीमेवर आणखी भारतीय सैनिक नियुक्त

खांद्यावरून क्षेपणास्त्र डागणारी तुकडी महत्त्वाची भूमिका साकारणार : नवी वाहनेही आणली

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

लडाख सीमेनजीक चीनने हेलिकॉप्टर्स नियुक्त केल्याने भारतानेही त्याला प्रत्युत्तर म्हणून अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा नियुक्त केली आहे. ही क्षेपणास्त्रs सैनिकांच्या खांद्यांवरून डागता येतात. याशिवाय भारताने आणखी वाहने आणि सैनिकांच्या अतिरिक्त तुकडय़ाही नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

खांद्यावरून डागता येणारी ही क्षेपणास्त्रे रशियन बनावटीची आहेत. या यंत्रणेला ‘इग्ला एअर डिफेन्स सिस्टिम’ असे संबोधले जाते. ही यंत्रणा भारतीय भूसेना आणि भारतीय वायुसेना यांच्याकडून उपयोगात आणली जाते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेच तर ही क्षेपणास्त्रे सीमेजवळ आणि कमी उंचीवर आलेल्या शत्रूच्या हेलिकॉप्टर्सना किंवा विमानांना पाडवू शकतात, असे सांगण्यात आले.

रडारांचीही नियुक्ती

चीनशी लागून असलेल्या सीमेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील स्थानांवर आणखी रडार स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे सीमेजवळ येणाऱया चीनी विमानांवर लक्ष ठेवता येणार असून त्यांच्या हालचाली टिपता येतील. भूमीवरून आकाशात मारा करू शकणारी क्षेपणास्त्रेही आणण्यात आली आहेत.

सुखोई विमाने सज्ज

भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी मे पासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. मे मध्ये सुखोई 30 एमकेआय ही रशियन बनावटीची अत्याधुनिक विमाने सीमेपासून काही अंतरावर नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांची मारक क्षमता चीनी विमानांपेक्षा जास्त आहे, असे सांगण्यात येते., ही विमाने आणि पाच राफेल विमाने यांच्या साहाय्याने भारत सीमासंरक्षण करू शकेल असे तज्ञांचे मत आहे.

महत्वाच्या स्थानांवर देखरेख

होटान, गर गुंझा, काशगर, हॉपिंग, कोंगा झोंग, लिंझी आणि पानगट या झिनझियांग प्रांतातील आपल्या वायुतळांवर चीनने गेल्या काही दिवसांमध्ये हालचालीं वाढविल्या आहेत. येथे आधुनिक विमाने आणून त्यांचा सराव केला जात आहे. त्यामुळे भारतानेही या हालचालींवर लक्ष ठेवले असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी जोरदारपणे करण्यात आली आहे.

तणाव कायम. तयारीही वाढविली

ड अत्याधुनिक क्षेपणास्त्रांसह भारताची सीमेवर अतिजोरदार तयारी

ड शब्द पाळण्याच्या तयारीत चीन नसल्याने सुरक्षेचे कठोर उपया

ड चीनने आगळीक केल्यास तिखट प्रत्युत्तर देण्यासाठी सेना सज्ज ड रशियन बनावटीची  क्षेपणास्त्रे आणि विमाने सीमेवर केली नियुक्त

Related Stories

तामिळनाडूत काँग्रेसची ‘जम्बो टीम’, चिदंबरम नाराज

Patil_p

पॉप स्टार रिहाना पाठेपाठ ग्रेटा थनबर्गची शेतकरी आंदोलनात उडी

triratna

उत्तरप्रदेशात हर्बल रस्त्यांचे काम पूर्ण

Patil_p

प्रीमियम रेल्वेत मनोरंजनाची सुविधा

Patil_p

यूपीएससी परीक्षेची तारीख जाहीर

datta jadhav

लॉकडाऊनमध्ये 31 मे पर्यंत वाढ

Patil_p
error: Content is protected !!