तरुण भारत

सेरेना, ओसाका यांचे विजय

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

येथे सुरू असलेल्या वेस्टर्न आणि सदर्न आंतरराष्ट्रीय महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्स आणि जपानची नाओमी ओसाका यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली.

Advertisements

सोमवारी झालेल्या महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित सेरेनाने हॉलंडच्या अरांत्झा रूसचा 7-6 (8-6), 3-6, 7-6 (7-0) असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. 23 वेळा ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणाऱया सेरेनाने या स्पर्धेतील पहिल्या फेरीत प्लिसकोव्हाचा तर दुसऱया फेरीत  केनीनचा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात बेलारूसच्या साबालेन्काने अमेरिकेच्या बेलीसचा 6-7 (1-7), 6-4, 7-5, जपानच्या चौथ्या मानांकित ओसाकाने मुचोव्हाचा 6-7 (5-7), 6-4, 6-2, युक्रेनच्या येस्ट्रीमेस्काने अमेरिकेच्या पेराचा 7-6 (7-5), 4-6, 6-3, झेकच्या बोझकोव्हाने आपल्याच देशाच्या क्विटोव्हाचा 2-6, 7-5, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

निवड समिती सदस्यांसाठी सुरिंदर अमरनाथचा अर्ज

Patil_p

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील 55 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून स्टोक्स बाहेर

Amit Kulkarni

पाकचा एकतर्फी मालिकाविजय

Patil_p

फिक्सर्स खेळाडूंशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात

Patil_p

एटीके बागानची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!