तरुण भारत

सिंदगीत सुरक्षा रक्षकाचा खून

एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तिघा दरोडेखोरांकडून कृत्य

वार्ताहर / विजापूर

एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तिघा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करून त्याचा खून केला आहे. ही घटना विजापूर जिल्हय़ाच्या सिंदगी शहरातील आयसीआयसीआय बँकेजवळ मध्यरात्री घडली. राहुल खिरू लमाणी (वय 25, रा. मदभावी तांडा) असे मृताचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सिंदगीतील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधील रक्कम लुटण्यासाठी तिघे दरोडेखोर सोमवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास आले होते. दरम्यान, एटीएमजवळ झोपलेला सुरक्षा रक्षक राहुल याच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून त्याचा हातोडय़ाच्या सहाय्याने खून केला. त्यानंतर एटीएममध्ये प्रवेश करून रक्कम लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोर करीत होते. मात्र, याचवेळी अचानक सायरन वाजल्याने दरोडेखोरांनी पलायन केले आहे. याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाले आहे. तसेच तिघांही दरोडेखोरांनी माकड टोपी घातल्याने त्यांची ओळख पटलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची नोंद सिंदगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सिंदगी शहरासह जिल्हय़ात खळबळ उडाली आहे.

Related Stories

आश्रय योजनेतील घरांसाठी बँका करणार अर्थसाहाय्य

Amit Kulkarni

शिवनेरी युवक मंडळातर्फे हुतात्म्यांना श्रद्धांजली

Omkar B

जांबेटी येथे छायाचित्रकारांची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

कुपोषित बालकांची संख्या घटविण्यासाठी प्रयत्न करा

Patil_p

आजही सरकारी बससेवा ठप्पच राहणार

Patil_p

विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा सपाटा

Patil_p
error: Content is protected !!