तरुण भारत

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 59 लाख 64 हजार 877 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 82 हजार 763 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत मंगळवारी 40 हजार 098 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1290 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 59.56 लाख कोरोना रूग्णांपैकी 32 लाख 56 लाख 201 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 25 हजार 913 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 477 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ब्राझीलमध्ये 36 लाख 74 हजार 178 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 28 लाख 48 हजार 395 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 7 लाख 9 हजार 115 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 16 हजार 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

इटलीत 6 कोटी लोक घरात कैद

tarunbharat

चौकशी पथक चीनला जाणार

Patil_p

देशात मागील २४ तासात २८ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद

Abhijeet Shinde

कोरोना संसर्ग :चीनमध्ये 24 हजार जणांचा मृत्यू

Patil_p

भारत-चीन चकमकीत चीनचे 5 सैनिक ठार, 11 जखमी

datta jadhav

किम जोंग उन यांच्या बहिणीला बढती

Amit Kulkarni
error: Content is protected !!