तरुण भारत

64 वर्षीय दाऊद इब्राहिमचे नवे प्रेमप्रकरण

पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश प्रेयसी असल्याची चर्चा

वृत्तसंस्था/ कराची

Advertisements

भारताचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमचे नाव सध्या पाकिस्तानी अभिनेत्री ‘ग्लॅमरस गर्ल’ मेहविश हयातसोबत जोडले जात आहे. दाऊदच्या धाकाने हयातला अनेक चित्रपटांमध्ये कामही मिळवून दिले आहे. मेहविशला आता गँगस्टर गुडिया या नावानेही ओळखले जात आहे.

मेहविश केवळ दाऊदच नव्हे तर अनेक क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही जवळीक साधून असल्याची चर्चा आहे. मागील वर्षी मेहविश हयातला पाकिस्तानच्या तमगा-ए-इम्तियाज या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हेते. पाकिस्तानच्या अत्यंत शक्तिशाली लोकांशी जवळीक असल्यानेच मेहविशला हा पुरस्कार मिळाल्याचे समाजमाध्यमांवर म्हटले गेले. एका प्रमुख संकेतस्थळाने तेव्हाच दाऊदशी तिची जवळीक असल्याचे संकेत दिले होते.

आयटम नंबर

स्वतःच्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी हयात पाकिस्तानची एक आघाडीची गायिकाही आहे. तिच्या कार्यक्रमांत अनेक वलयांकितांना निमंत्रित केले जाते, यात क्रिकेटपटू, राजकारणी आणि उद्योजक सामील आहेत. पाकिस्तानी चित्रपटांमध्ये आयटम नंबर केल्यावर हयातला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतरच ती दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आली आणि त्याच्या धाकामुळे तिला काही मोठय़ा बजेटचे चित्रपट मिळाले. दाऊदच पाकिस्तानच्या चित्रपटसृष्टीत पैसा गुंतवितो, दाऊदचे कराची आणि लाहोरमधील अनेक मोठे निर्माते आणि दिग्दर्शकांशी आर्थिक संबंध आहेत.

समाजमाध्यमांवर लक्ष्य

37 वर्षीय हयातचे ट्विटरवर 14 लाख फॉलोअर्स आहेत. अलिकडच्या काळात हयातला समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेक भारतीयांनी तिला ट्विटरवर ट्रोल करत 1993 च्या मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो निष्पापांची हत्या करणाऱया गुन्हेगारासोबत तू नात्यात असल्याचे सुनावले आहे. पाकिस्तानी नागरिकांनीही हयातला सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हयातचा दावा

ट्विटरवर ट्रोल करण्यात आल्यावर हयातने स्वतःच्या विरोधात कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. दाऊदसोबत माझे प्रेमसंबंध नाहीत, माझा द्वेष करणाऱयांनीच ही अफवा पसरविल्याचे तिने म्हटले आहे.

Related Stories

व्ही-चॅटवर बंदी घातल्यास चीन अ‍ॅपल कंपनीवर बहिष्कार टाकेल

datta jadhav

भारतीय वंशाचे प्रीतम सिंह सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेतेपदी

datta jadhav

फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉक डाऊन

prashant_c

चीनचा WHO विरोधात आक्रमक पवित्रा

datta jadhav

भारतानंतर आता अमेरिकेतही टिक टॉक आणि वी चॅटवर बंदी

Rohan_P

अफगाणिस्तानसंबंधी अमेरिका, ब्रिटनचा नवा इशारा

Patil_p
error: Content is protected !!