तरुण भारत

बंदी काळातील तोटा फुलविक्रेत्यांनी काढला गणेशोत्सवात भरुन

चिपळुणात फुलाचे अव्वाचे सव्वा दर, घाटमाथ्यावर आवक घटल्याने झेंडू झाला महाग

चिपळूण

Advertisements

ऐन गणेशोत्सवात घाटमाथ्यावरील झेंडूची आवक घटल्याने या संधीचा स्थानिक फुलविक्रेत्यांनी फायदा उठवत बंदी काळातील ‘तूट’ भरून काढली. झेंडूबरोबरच इतर फुलांचे व पर्यायाने हारांचे दर वाढल्याने गणेशभक्तांच्या खिशाला चांगलीच चाट बसली.

शनिवारी आगमन झालेल्या लाडक्या बाप्पाच्या पूजा-आरतीदरम्यान आवश्यक फुलांसाठी भक्तांना खिसा रिकामा करावा लागला. पावसामुळे घाटमाथ्यावर ऐन गणेशोत्सवात झेंडूची आवक घटल्याने स्थानिक विक्रेत्यांना झेंडू चढय़ा भावाने मिळाला. त्यातच पार्सल सेवाही बंद असल्याने ने-आणीचा खर्चदेखील विक्रेत्यांवर आल्याने विक्रेत्यांना झेंडूचा दर महाग पडला. अशा परिस्थितीत आपला फायदा करुन घेण्यासाठी विक्रेत्यांनी ऐन गणेशोत्सवात भक्तगणांची लूट केली. मार्च महिन्यात सुरु झालेल्या लॉकडाऊनपासून मे महिन्यापर्यंत फुलविक्रीचा व्यवसाय ठप्प होता. यावेळी सहन करावा लागलेला तोटा भरुन काढण्याच्या दृष्टीने ‘गणित’ करून फुलविक्री दर वाढवले. विशेष म्हणजे नेहमी 20 ते 30 रुपये दरात मिळणारा फुलहार थेट 80 रुपयांच्या घरात गेला होता. तसेच उर्वरित मोठय़ा फुलहारांचे दर सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर होते. जो-तो फुलविक्रेता आपल्या मर्जीप्रमाणे फुलाचे दर ठरवत असल्याने पावलोपावली फुलांचे दर बदलत होते.

याविषयी भक्तगणांनी विचारणा केल्यास घाटमाथ्यावर झेंडू मिळतच नसल्याचे कारण पुढे केले जात होते. गौरीपुजनासाठी आवश्यक गजऱयाच्या किंमतीही भरमसाठ वाढल्याचे दिसून आल्या. यामुळे भक्तगणही हात आखडता घेत केवळ आवश्यक तेवढय़ाच फुलांची खरेदी करताना दिसत होते.

Related Stories

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे – अजित पवार

triratna

एमटीडीसीचे कोकणातील सर्व रिसॉर्ट सुरू करण्याचा निर्णय

NIKHIL_N

रत्नागिरी : लोटेतील समर्थ केमिकल कंपनीत स्फोट

triratna

कोकण विकास महामंडळासाठी पाठपुरावा

NIKHIL_N

नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बोगद्यातच बिघाड

triratna

अडकलेल्या दोन ट्रेकर्सची खेड पोलिसांकडून सुखरूप सुटका

Patil_p
error: Content is protected !!