तरुण भारत

बैलगाडी शर्यत भरविल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

कारवाई दरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक जखमी, बोरगाव पोलिसांची निसराळे येथे कारवाई

प्रतिनिधी/ नागठाणे (संग्रहित छायाचित्र)

Advertisements


कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यानी कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम न करण्याचे व सार्वजनिकरित्या जमून खेळ न करण्याचे आदेश देऊनही निसराळे (ता.सातारा) येथे बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या सात जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच कारवाई करतेवेळी महिला पोलीस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी यातीलच एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी दुपारी बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलिसांनी तीन बैल,तीन दुचाकी व दोन पीक अप जीप ताब्यात घेतल्या आहेत.

अमोल शंकर शिंदे (वय.२७,रा चरेगाव, ता.कराड),जालिंदर लक्ष्मण भोसले (वय.४०,रा.शेंद्रे,ता.सातारा),सागर मंगेश पवार (वय.२४),गौरव रणजित पवार (वय.१९),विश्वनाथ पांडुरंग पवार(वय.१८),राहुल शिवाजी पवार (वय.३१) व कुलदीप विनायक पवार (वय.२७,सर्व रा.वर्णे,ता सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी निसराळे( ता.सातारा) येथे बेलदार वस्तीजवळ बैलगाड्यांच्या शर्यती सुरू असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार विशाल जाधव,विजय साळुंखे,किरण निकम व चालक कपिल टीकोळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचेल. पोलिसांना पाहताच तेथे पळापळ सुरू झाली.यावेळी पोलिसांनी तेथून सात जणांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात घेतेवेळी त्यापैकी सागर मंगेश पवार हा त्याच्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी त्याची दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला.यावेळी सागर पवार याने ढकलून दिल्याने पीएसआय वर्षा डाळींबकर या जखमी झाल्या.यावेळी इतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.पोलिसांनी सागर पवार याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा व त्याच्यासह अन्य सर्व संशयितांवर भा.द.वि. कलम ३३२,१८८,२६९,२७०,२७१,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब),महाराष्ट्र कोव्हिडं १९ अधिसूचना नियम ११,साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३,महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ ( एल)(सी)(जी)(एन) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.

Related Stories

पालिकेच्या कर्मचाऱयांना मिळणार पत्नीच्या नावाने घरे

Patil_p

रिक्त पदे भरल्याने आरोग्य विभागाचे मनुष्यबळ वाढले

Amit Kulkarni

लॉकडाऊनला 21 दिवस पूर्ण; बाधितांचा आकडा वाढताच

Amit Kulkarni

पॉझिटिव्हिटी कमी झाल्याने आजच्या निर्णयाकडे लक्ष

datta jadhav

कराड, साताऱ्यात वाढ सुरूच; ९२१ रुग्णांची वाढ

triratna

कराड येथील दोन नागरिक बाधित तर 171 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

triratna
error: Content is protected !!