तरुण भारत

प्रारंभीची वाढ गमावत सेन्सेक्स-निफ्टी हलक्या तेजीसह बंद

वृत्तसंस्था / मुंबई :

चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार प्रारंभीची तेजी गमावत अंतिम क्षणी हलकी तेजी प्राप्त करत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील कल नकारात्मक राहिला होता याचा प्रभाव बाजारातील कामगिरीवर राहिला होता.

Advertisements

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे शेअर बाजाराने प्रारंभीच्या काळात तेजी कमावली होती. परंतु ही तेजी कायम राखण्यात बाजार अपयशी ठरला आहे. अंतिम क्षणातील काही तासात विक्रीच्या दबावामुळे समभाग खालच्या पातळीवर येत बाजार बंद झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 39.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 39,113.47 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 9.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,559.25 वर बंद झाला.

दिवसभराच्या व्यवहारानंतर इंडसइंड बँक सर्वाधिक सहा टक्क्मयांनी नफ्यात राहिली आहे. तर सोबत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, स्टेट बँक, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, सन फार्मा आणि मारुती सुझुकी यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये  ओएनजीसी, बजाज ऑटो आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग घसरले आहेत.

गुरुवारी बाजाराचा प्रवास हा तेजी सोबत झाला आहे, कारण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या एका वक्तव्यामुळे तेजीसह बाजारात उत्साह राहिला. तसेच ऑगस्ट महिन्यातील वायदा आणि अन्य अनुबंध समाप्त झाल्याने काही गुंतवणूकदार सावध राहिले आहेत, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. जागतिक तेल मानक बेंट क्रूडचा भाव हा 0.04 टक्क्मयांनी वधारुन 46.18 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे. याच कालावधीत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 48 पैशांनी वधारुन 73.32 वर बंद झाला आहे. तसेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या वक्तव्यामुळे रुपयात मजबूती आली होती. केंद्रीय बँकेकडे कोविड 19 च्या संकटाला थोपविण्यासाठी

Related Stories

व्याज सवलतीची मुदत वाढवली

Patil_p

प्रोसीड इंडियाने दिला 11 हजार टक्के परतावा

Patil_p

नोव्हेंबरच्या दुचाकी विक्रीत स्प्लेंडरचा दबदबा कायम

Omkar B

अपॅक्सकडून 3 आय इन्फोटेकची खरेदी

Omkar B

डिजिटल आणि दूरदर्शन जाहिरात महसुलात होणार वाढ

Amit Kulkarni

आता 75 टक्के देवाणघेवाण मोबाईल बँकिंगद्वारा होणार

Patil_p
error: Content is protected !!