22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

पाकिस्तानच्या कराचीत गणेशोत्सव साजरा

कराची / वृत्तसंस्था

मंदिरात मोठा मंडप, शंखनाद करणारे भाविक, पारंपरिक पोशाखातील महिला ‘जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती’ ही आरती म्हणताना पाहणे आपल्यासाठी सामान्य बाब ठरू शकते. परंतु हे दृश्य पाकिस्तानच्या कराची शहरातील असल्यास बहुधा यावर सर्वप्रथम विश्वासच बसणार नाही. तेथे राहणारी 800 पेक्षा अधिक मूळची महाराष्ट्रातील कुटुंबे कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत.

या कुटुंबांनी कराचीच्या बडा मंदिरात दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला आहे. या उत्सवामुळे पूर्ण वर्षभराची ऊर्जा मिळाल्याचे त्यांचे सांगणे आहे. कराचीच्या रत्नेश्वर महादेव मंदिर, गणेश मठ मंदिर आणि स्वामीनारायण मंदिरात हा उत्सव होतो.

तेथील गणेशोत्सवाची सुरुवात कृष्णा नाईक यांनी 76 वर्षांपूर्वी केली होती. फाळणीवेळी ते कराचीत जाऊन स्थायिक झाले होते. कृष्णा यांच्या नंतर त्यांचे पुत्र आणि त्यांचीही पुढील पिढी ही परंपरा पुढे नेत आहेत. नाईक कुटुंबाने काही लोकांसोबत मिळून याची सुरुवात केली होती. पुढील काळात कराचीतील अनेक मराठी कुटुंबांना यात जोडले गेले.

कराचीत  महाराष्ट्रीयन पंचायतची स्थापना करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात. सद्यकाळात कराचीत 800 पेक्षा अधिक मूळ कोकणी मराठा लोकांचे वास्तव्य आहे. कराचीत हिंदूधर्मीयांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

Related Stories

आठवडय़ात सोने 2,500; चांदी 10 हजारांनी स्वस्त

Patil_p

बब्बर खालसा इंटरनॅशनलचे दोन दहशतवादी अटकेत

datta jadhav

देशात 28,903 रुग्णांची वाढ

datta jadhav

पंतप्रधान मोदींची परवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

सामूहिक कार्यक्रमांना सशर्त मंजुरी

Patil_p

देशात 24 तासात 1 हजार 993 नवे कोरोना रुग्ण; 73 जणांचा मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!