तरुण भारत

पुढच्या वर्षी लवकर या….!

प्रतिनिधी / रत्नागिरी :

‘गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात गुरूवारी जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक न काढता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शांतपणे सायंकाळी उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. गुरूवारी जिल्हय़ात 1 लाख 15 हजार 536 घरगुती गणेशमुर्तीना अतंत्य जड अंतःकरणाने गणेशभक्तांनी निरोप दिला. तर 8 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

Advertisements

  कोरोनाचे सावट असतानाही जिह्यात बाप्पाचे उत्साहात स्वागत झाले आणि तेवढय़ाच हळव्या अंत:करणाने गणेशभक्तांनी बाप्पाना व गौरींना भावपूर्ण निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जारी सुरक्षा उपायांचा परिणाम यावेळी विसर्जनावर दिसून आला. ढोल-ताशांचा दणदणाटाला फाटा देत फक्त गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…असा जयघोष आणि तो सुध्दा निवडक मंडळींच्या उपस्थितीत सुरु होता. 

  रत्नागिरी शहर व परिसरात सायंकाळी उशिरापर्यत गणेश मंडळे व घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू होते. रत्नागिरीत प्रामुख्याने मांडवी चौपाटीवर व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. नगर परिषदेने गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी कृत्रिम तलाव व मूर्ती संकलन पथक कार्यरत ठेवले होते. काही घरगुती गणपतींचे भाटय़े, पांढरासमुद्र, किल्ला, मिऱया येथेही विसर्जन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी, जीवरक्षक, सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले होते. दुपारपासूनच गणेश विसर्जनासाठी भक्तगण बाहेर पडले होते. 

  बाप्पावर जागोगाजी फुलांचा वर्षाव, गुलालांची उधळण, फटाके, नृत्य, डीजे असे जल्लोषाचे रंग व ते पाहण्यासाठीची गर्दी या साऱयाला यावर्षी विराम देण्यात आला होता. विसर्जन ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने विसर्जन सोहळा शिस्तबद्ध व निर्विघ्नपणे सायंकाळी सुरू होता. ग्रामीण भागात समुद्र, तलाव, डोह, नदयांमध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

Related Stories

एसटीची सेवा सुरळीत, रत्नागिरीत आजपासून सुरू झाली शहर बससेवा

triratna

चिपळुणात बँकेचे एटीएम फोडणारा अटकेत

Patil_p

सर्व्हर डाऊनमुळे जमीन मोजण्या रखडल्या

NIKHIL_N

कोविडसाठी प्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार!

NIKHIL_N

धोकादायक वीज खांबांची नगराध्यक्षांकडून दखल

NIKHIL_N

जिल्ह्यात आणखी ३१ पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!