तरुण भारत

गणोत्सव आज होणार झी म्युझिक मराठीवर प्रदर्शित

प्रतिनिधी / बेळगाव :

बेळगावचा दिग्दर्शक, निर्माता, सिनेमोटोग्राफर प्रथमेश परेश शिंदे याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास तयार केलेली गणोत्सव 2020 हे गीत शुक्रवार दि. 28 रोजी दुपारी 1 वाजता झी म्युझिक मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.

Advertisements

कोरोना आणि यंदाचा बदललेला गणेशोत्सव यावर आधारीत हे गीत आहे. गीतकार किरण जाधव यांच्या या गाण्यावर मयुर रमावत (राजस्थान) यांनी म्युझिक प्रोडक्शनची प्रक्रिया केली असून अनिकेत हेरंजाल यांनी कंपोजींग केले आहे. श्रीवत्स जमीहाळ व निकीता मत्तीकोप यांची व्हिडीओ एडीटींग व हर्ष परेश शिंदे यांचे सहाय्यक दिग्दर्शन गीताला लाभले आहे. सागर चंदगडकर व समीक्षा जोशी यांनी हे गीत गायले आहे. अभिनेता सोहनकुमार व अभिनेत्री शलाका सोहन यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

गाण्याच्या चित्रीकरणासाठी अनिकेत पुजारी, करण बिर्जे, उदीत रेगे, अशुतोष पाटील, राहुल पवार, स्वीकार मायाण्णाचे आदींनी विशेष सहकार्य दिले आहे. तरुण भारत सोशल मीडीया टीमचा या गीतात विशेष सहभाग असून माध्यम प्रायोजक म्हणूनही तरुण भारतचे सहकार्य लाभले आहे. बेळगावकरांनी बेळगावच्याच तरुणांनी घेतलेल्या या झेपेचे कौतुक करण्यासाठी गीताला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम

Amit Kulkarni

कोबीज फेकून शेतकऱयांनी केला निषेध

tarunbharat

ऊस दर निश्चित करा, अन्यथा आंदोलन

Amit Kulkarni

भाजीपाला पिकांवर पाणी सोडण्याची वेळ

Patil_p

कर्फ्यूच्या धास्तीने काजू उत्पादक चिंतेत

Amit Kulkarni

आजपासून बँकांचे व्यवहार दुपारी 2 पर्यंतच सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!