तरुण भारत

खडकलाट येथे कोरोनाचा पहिला बळी

वार्ताहर /खडकलाट :

खडकलाटसह परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून खडकलाट येथे एका साठ वषीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय गुरुवार दि. 27 रोजी आणखीन बारा रुग्णांची भर पडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या पाच-सहा दिवसापासून चिकोडी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या येथील साठ वषीय महिलेचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.  शासनाच्या नियमानुसार सदर महिलेचा मृतदेह गावाकडे पाठवण्यात आला. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व टास्क फोर्स सदस्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक स्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर महिलेच्या संपर्कात असलेल्या आणि दहन करण्यासाठी गेलेल्या तीन व्यक्तींना होम क्वारंटाईन  करण्यात आले. याशिवाय येथील एका दाम्पत्याला गेल्या पंधरा दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील घरातील 26 पैकी 12 जणांचा कोरोना अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. या सर्वांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बेनाडीतील निवृत्त शिक्षकाचा मृत्यू

निपाणी : बेनाडी येथील सिध्देश्वर देवालयानजीक राहणाऱया एका माजी मुख्याध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांना निपाणीतील खासगी रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर 21 रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विजापूर जिल्हय़ात 134 नव्या रुग्णांची भर

विजापूर :जिल्हय़ात गुरुवारी नव्या 134 रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 6206 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर दिवसभरात तिघांचा बळी गेला आहे. तर 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण मृतांची संख्या 91 इतकी आहे. तसेच जिल्हय़ातील विविध रुग्णालयात 836 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Related Stories

हालसिद्धनाथ यात्रेची पालखी सोहळय़ाने सांगता

Patil_p

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण

Patil_p

नर्सिंग विद्यार्थ्यांना विद्याश्री वेतन द्या

Omkar B

कोरोनासंदर्भात प्रक्षोभक माहिती प्रसारित केल्यास कारवाई

Patil_p

चिकोडी तालुक्यात 5 जणांना बाधा

Patil_p

शिवानी भोसले यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

Patil_p
error: Content is protected !!