लंडन : पाकिस्तान विरूद्ध होणाऱया टी-20 क्रिकेट मालिकेतून इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जेसॉन रॉयला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे. जेसॉनला सरावावेळी स्नायू दुखापत झाली होती. पाकचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर आहे.
उभय संघातील यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पाकचा पराभव केला. आता उभय संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका आज (28 ऑगस्ट) ओल्ड ट्रफोर्ड येथे खेळविली जाणार आहे.
दरम्यान मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा संघ आगामी मालिकेसाठी सराव करीत असताना जेसन रॉयला स्नायू दुखापत झाली. स्कॅनिंगनंतर डॉक्टरांनी रॉयला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
असल्याने तो पाक विरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. पाक विरूद्ध मालिका संपल्यानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेला 4 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
या मालिकेत रॉय कदाचीत उपलब्ध होईल पण त्याची या मालिकेपूर्वी तंदुरूस्ती चांचणी घेतली जाईल, असे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.