तरुण भारत

चीनने दक्षिण चीन समुद्रात डागली दोन ‘किलर’ क्षेपणास्त्रे

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

अमेरिकेला इशारा देण्यासाठी चीनने दक्षिण चीन समुद्रात दोन ‘किलर’ क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यानंतर हा युद्धसरावाचा एक भाग असल्याचे सांगत चीनने सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या टेहाळणी विमानांनी चीनच्या हद्दीत प्रवेश करून तेथील हालचाली टिपल्या होत्या. त्यामुळे आक्रमक झालेल्या चीनने अमेरिकेला क्षेपणास्त्रे डागून इशारा दिला. तेथील स्थानिक वृत्तसंस्थांनुसार, बुधवारी दोन घातक क्षेपणास्त्रे हॅनॉन आणि पार्सेल बेटांदरम्यान समुद्रात डागण्यात आली. याच भागात काही दिवसांपूर्वी अमेरिकन युद्धनौका ‘रोनाल्ड रीगन’ने पार्सेल बेटाजवळ युद्धसराव केला होता. 

दक्षिण चीन समुद्रात क्षेपणास्त्र डागून चीनने अमेरिकेला एक प्रकारचे आव्हानच दिले आहे. दोन्ही देशातील तणाव वाढला असला तरी देखील चीन स्वतःहून अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच दक्षिण चीन या वादग्रस्त भागात अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांचे दळणवळण न रोखण्याचे आदेशही चीनने त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Related Stories

दक्षिण आफ्रिका : प्रवासबंदी

Omkar B

अमेरिकेत मुलांचेही होणार लसीकरण

Patil_p

खरंच -वाहिन्यांशिवाय होणार वीजपुरवठा

Patil_p

जगभरात 3.5 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

आणीबाणी हटविली

Patil_p

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची मंजुरी

datta jadhav
error: Content is protected !!