तरुण भारत

‘या’ किनाऱ्यावर आढळले 18 मृत देवमासे

ऑनलाईन टीम / पोर्ट लुईस : 

मॉरिशसच्या आग्नेयेकडील ग्रँड सेबल समुद्रकिनाऱ्यावर 18 मृत देवमासे आढळून आले आहेत. देवमाशांचा पोट आणि फुप्फुसांचा विच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

Advertisements

हे 18 देवमासे ग्रँड सेबल समुद्रकिनाऱ्यावर वाहून आले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. ऑगस्टच्या सुरुवातीला जपानी जहाजातून झालेल्या 1 हजार टनापेक्षा जास्त तेलगळतीमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, देवमाशांच्या शरीरावर किंवा त्यांच्या श्वसनसंस्थेत हायड्रोकार्बनचे अंश आढळले नाहीत. 

बुधवारी सायंकाळपर्यंत या देवमाशांच्या विच्छेदनाचे काम सुरू होते. त्याच्या अहवलातून माशांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले.

Related Stories

अमेरिकेत 5 लाख भारतीयांना मिळणार नागरिकत्व

datta jadhav

ब्रिटिश प्रवाशांवर बंधने

Patil_p

किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम, 20 दिवसांनी आले जगासमोर

datta jadhav

जगभरात मागील 24 तासात 2.60 लाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

मुल्ला बरादर गोळीबारात जखमी

Patil_p

अमेरिकेच्या सीडीसीने पुन्हा बदलली मागदर्शक तत्वे

Omkar B
error: Content is protected !!