तरुण भारत

आग्रा : आठवड्यातील 2 दिवसीय लॉकडाऊनचे नियम आता अधिक कडक

ऑनलाईन टीम / आग्रा : 


आग्र्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू होत असलेल्या दोन दिवसीय आठवड्याच्या लॉक डाऊनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच बाजारपेठांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरांद्वारे लक्ष ठेवले जाईल. 

Advertisements


काल झालेल्या बैठकीत डी एम प्रभू एन सिंह यांनी शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या लॉक डाऊनच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी एडीएम सिटी आणि एसपी सिटी यांना आदेश दिले आहेत. 


कोरोना रोखण्यासाठी काही खास ठोस योजना होत नसल्याने हाय कोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर डी. एम.  प्रभू एन सिंह यांनी आठवड्यामध्ये केल्या जाणाऱ्या लॉक डाऊनचे नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत. 


एम डी सिटी डॉ. प्रभकांत अवस्थी यांनी सांगितले की, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कोणीही घरातून बाहेर पडू नये. तसेच या काळात शहरात कडक नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवले जाईल. आणि बाहेर पडणाऱ्या लोकांनी मास्क घातला नसेल तर त्यांच्या कडून  500 रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

Related Stories

अतिवृष्टीमुळे तामिळनाडूतील जनजीवन बेहाल

Amit Kulkarni

जम्मू : उद्यापासून सुरु होणार वैष्णव देवी यात्रा

Rohan_P

370 हटल्यावर विकासाचे नवे पर्व सुरू

Patil_p

भारत-चीन संघर्षावर पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

तालिबान दोन-तीन दिवसात सरकार स्थापन करणार

datta jadhav

झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल, तर मग हे शुद्धीत कसे असणार? ; नितेश राणेंचा सवाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!