तरुण भारत

शिक्षण-राजकारण दूर ठेवा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

शिक्षण क्षेत्राला सर्व राजकीय पक्षांनी राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केले आहे. अंतिम परीक्षा दिल्य ाशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला पदवी देण्यात येऊ नये, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले.

Advertisements

अंतिम परीक्षा घेण्याचा अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाचा आहे. आयोगाने परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देऊ नये असा आदेश राज्यांना दिला आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. कारण हा विषय देशातील कोटय़वधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे. राजकीय पक्ष त्यांच्या विद्यार्थी संघटनांना खूष ठेवण्यासाठी अंतिम परीक्षा न घेताच पदवी द्यावी असा आग्रह धरीत आहेत. तसेच महाराष्ट्र वर दिल्ली या राज्यांनी तर यावर्षी कोणतीही अंतिम पदवी परीक्षा होणार नाही असे आधीच घोषित केले आहे. तथापि, या राज्यांची ही कृती अनुदान आयोगाच्या नियमांच्या विरूद्ध आहे. न्यायालयात या राज्यांचा युक्तीवाद टिकणार नाही, असा इशारा तज्ञांनी आधीच दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाची बाजू योग्य असल्याचे स्पष्ट šााले. परिणामी विद्यापीठांना परीक्षा घेण्याची तयारी करावी लागणार आहे. देशातील काही विद्यापीठांनी ती तशी झाल्याची घोषणा केली. ताज्या निर्णयाने परीक्षा विषयक अनेक प्रश्नांवर पडदा पडला आहे.

Related Stories

देशात 2 लाखांहून अधिक कोरोनामुक्त

Patil_p

अनंतनागमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

149 नागरिक लंडनहून जयपूर शहरात दाखल

Patil_p

विरोधक अडले, सरकार ठाम

Patil_p

अंतराळक्षेत्राकरिता खासगी प्रस्तावांचा प्रतिसाद

Omkar B

ब्राझीलकडून कोव्हॅक्सिन खरेदी करार लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!