तरुण भारत

कुडचीत एकाचा मृत्यू तीन पोलिसांसह 13 बाधित

वार्ताहर / कुडची

  शुक्रवारी कुडची (ता. रायबाग) येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयातील परिचारिका व तीन पोलिसांसह 13 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील तब्बल आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर मृत व्यक्ती हा आठ जणांच्या कुटुंबातीलच आहे. तसेच सरकारी रुग्णालयातील परिचारिकेला बाधा झाल्याने आरोग्य खात्याच्या वर्तुळातून भीती व्यक्त होत आहे.

Advertisements

  कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात कुडची शहर हॉटस्पॉट बनले होते. प्रशासन व विविध खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱयांच्या समन्वयामुळे कुडची येथील रुग्णसंख्या आटोक्मयात आली होती. या सर्वांच्या समन्वयामुळे कुडची शहर कोरोनामुक्त झाले होते. तसेच या टीमवर्कचा आदर्श अन्यत्र घेण्यात आला. मात्र, शुक्रवारी एकाच कुटुंबातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृत व्यक्ती ही या आठ जणांच्या कुटुंबातील असून 13 जण पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या सूचनेनुसार सर्व पोलिसांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. यात कुडची येथील एका पोलिसाला बुधवारी तर दोघांना गुरुवारी कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे.

 आता संसर्ग वेगाने पसरत असल्याने पोलिसांनाही लागण झाली आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण करून पोलीस स्थानक सील केले असून सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

Related Stories

बेळगावच्या महिलांचे सौंदर्य स्पर्धेत यश

Omkar B

गांधीनगर जवळ हरणांची शिंगे जप्त

Patil_p

महात्मा गांधी पुरस्कारासाठी ग्रा.पं.ची नावे सरकारकडे

Amit Kulkarni

पदवीपूर्व शिक्षण विभाग प्रभारी उपसंचालकपदी आर. पट्टणशेट्टी

Omkar B

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

Patil_p

मासिक बसपासच्या मागणीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!