तरुण भारत

उत्तराखंड : भाजपचे प्रदेश अध्यक्ष बंशीधर भगत यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / हल्द्वानी : 


उत्तराखंडातील भाजपचे प्रदेश चे अध्यक्ष बंशीधर भगत यांचा मुलगा विकास भगत यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, विकास भगत यांना तीन दिवसांपासून ताप होता. शुक्रवारी त्यांना सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवले असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


विकास हे भाजयुमो मधील प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रतिनिधी देखील आहेत. तिवारी हॉस्पिटल मधील डॉ. जोशी यांनी सांगितले की, विकास भगत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 


पुढे डॉ. जोशी म्हणाले की, सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये सध्या 190 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 42 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 28 जण आयसोलेशनमध्ये आहेत. 

Related Stories

हरियाणामध्ये गेल्या 24 तासात 694 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 26,858

Rohan_P

महंत नरेंद्र गिरी मृत्यूप्रकरणी आनंद गिरी आरोपी

Patil_p

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे!

Patil_p

‘आयुष्मान’ अंतर्गत उपचाराच्या कक्षेत वाढ

Patil_p

गेल्या 24 तासात देशात 941 नवे कोरोना रुग्ण, तर 37 मृत्यू

prashant_c

स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

datta jadhav
error: Content is protected !!