तरुण भारत

पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जादुरा गावात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. 

Advertisements

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी दुपारपासून पुलवामा परिसरात शोधमोहीम राबवली. त्यावेळी जादुरा गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जादुरा गावातील दहशतवादी लपलेल्या घराला घेराव घातला. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दल आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि पोलिसांना यश आले.

मागील 24 तासात पुलवामा परिसरात दोन वेळा चकमक झाली. शुक्रवारी शोपियामध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. सुरक्षा दल आणि पोलिसांकडून अद्याप या भागात शोधमोहीम सुरू आहे. 

Related Stories

बटाटय़ाला मात देणार अळूचा गड्डा

Patil_p

नवे कायदे कृषिक्षेत्राला उद्ध्वस्त करणार

Patil_p

भारताला जगभरात नवीन ‘फार्मा हब’ म्हणून स्वीकृती

datta jadhav

कोरोनाला रोखण्यासाठी एनपीसीआयकडून डिजिटल पेमेंट्सचे आवाहन

tarunbharat

नवीन कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ हरियाणातील शेतकरी संघटनांचे कृषिमंत्र्यांना पत्र

datta jadhav

भाजपला धक्का! माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास

Rohan_P
error: Content is protected !!