तरुण भारत

‘या’ राज्यात आता 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

ऑनलाईन टीम / रांची : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी झारखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने लॉकडाऊनच्या काळात असलेले निर्बंध 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच अनलॉक चे नियम जारी करण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली. 

Advertisements


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, झारखंड सरकारने 30 सप्टेंबर पर्यंतचे अनलॉकचे निर्देश जारी केले आहेत. तसेच सर्व लोकांना आवाहन केले की, सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यासोबतच चेहऱ्याला मास्क लावावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. 


नवीन नियमानुसार, राज्यात काही नवीन विशेष सूट दिली नाही आहे मात्र, कॅन्टोन्मेंट झोनबाहेर सरकारने सर्व आर्थिक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण कॅन्टोन्मेंट झोन मध्ये अजूनही काही ठिकाणी पहिल्या प्रमाणेच निर्बंध असणार आहेत. 


यामध्ये सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील आयोजनांवर बंदी असणार आहे. जत्रा, जुलूस यांना देखील परवानगी नाकारण्यात आली आहे. आंतरराज्यीय बससेवा बंद राहील. तसेच थिएटर, स्विमिंग पुल, जीम, मनोरंजन पार्क अजूनही बंदच ठेवली जाणार आहेत. 

Related Stories

आप ही आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी : चन्नी

Sumit Tambekar

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडला

Omkar B

पंजाब विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात विधेयके

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखाचा टप्पा

datta jadhav

कोरानाचा ‘उत्पात’..शेअरबाजारात ‘दाणादाण ’

tarunbharat

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

datta jadhav
error: Content is protected !!