तरुण भारत

पणजी शहरातील पे पार्किंगसाठी नऊ जागा अधिसूचित

पणजी: महापालिकेने शहरातील सूचविलेल्या काहि जागा पे पार्किंगसाठी उत्तर जिल्हाधिकारी आर मेनका यांनी नुकत्याच नऊ जागा अधिसूचित केल्या आहेत. पार्किंग शुल्क आकारण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात येणार असून त्याबद्दल निविदा पुढील महिन्यात काढण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यात पे पार्किंग सुरू करण्यात येणार आहे.
या पे पार्किंगसाठी दुचाकी वाहनांसाठी पहिल्या चार तासांसाठी 4 रूपये, आठ तासांकरिता 8 रूपये आणि 12 तासांपुढे आणि 24 तासांच्या आतील वेळेकरिता 15 रूपये आकारण्यात येतील. तसेच चार चाकी वाहनांसाठी पहिल्या तासाकरिता 20 रूपये आणि पुढील प्रतितास 15 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पे पार्किंग लागू होणार्‍या ठिकाणी दरफलक लावले जातील. लवकरच पे पार्किंगसाठी आखणीहि केली जाईल.
सदर पे पार्किंग पाटो प्लाझा येथील जुना पाटो पुल ते वृदावन बिल्डिंग (पाटो सरकारी वसाहतीजवळ) व सपना बिल्डिंग ते कार्दोझ बिल्डिंग, महाlमा गांधी मार्गावर म्हामई कामत घर ते काकुलो बेट, दयानंद बांदोडकर मार्गावर बेती फेरीधक्का ते सुलभ शौचालय, नव्या पाटो पुलाजवळ केणी पेट्रोल पंप ते जुना पाटो पूल व टपाल मुख्यालयासमोर टोबॅको स्क्वेअर परीसर तसेच पोस्ट मास्तर जनरल कार्यालयाच्या मागील बाजूचा पाfरसर, मिनेझिस ब्रागांझा मार्गावर कॅफे भोसले समोरील परीसर ते सेडमार अपार्टमेंट, स्टेट बँकेच्या मागील बाजूस हॉटेल मांडवी ते कस्टम हाऊस, विनंती हॉटेल ते कस्टम हाऊस, 18 जून रस्ता ते मिनेझिस ब्रागांझा रस्ता (नेपच्यून हॉटेलजवळ), जनरल बेना र्द गिडीस मार्ग (आयनॉक्स ते गीताबेकरी ते सरकारी मुद्रणालय) या ठिकाणी करण्यात येणार आहे.

Related Stories

लॉकडाऊनच्या काळात सामान्य लोकांच्या मदतीला पोचले ‘दामू नाईक’

Omkar B

वीज बिलांतील 50 टक्के सवलत हा निष्काळजीपणे घेतलेला निर्णय

Patil_p

पणजी संस्कृती भवनमध्ये आज ‘लग्नफेरे’

Amit Kulkarni

मालेगावात 27 नवे कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 325 वर

datta jadhav

देशात पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य : जावडेकर

datta jadhav

सप्टेंबर महिन्यात सासष्टीत कोरोनाचे 21 बळी

Patil_p
error: Content is protected !!