तरुण भारत

राशिभविष्य

मेष

कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात गिऱहाईकाच्या बरोबर संयमाने बोला. सप्ताहाच्या शेवटी संसारात किरकोळ वाद, तणाव होईल. नोकरीत रागाच्या भरात कठोर बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या स्पष्ट, खंबीर बोलण्याने विरोधक आक्रमक होऊ शकतात. मान-प्रति÷ा सांभाळता येईल. कायदा पाळूनच वाहन चालवा. ओळखी होतील.

Advertisements

वृषभ

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यातील चर्चा यशस्वी होईल. फायदा वाढेल. शेअर्समधील लाभ घ्या. नोकरीत  वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकवाल. रागाच्या भरात वाद वाढवू नका. प्रवासात घाई नका. संसारात जबाबदारी घ्यावी लागेल. नवीन ओळखीमुळे  तुमचा उत्साह वाढेल. पोटाची काळजी घ्या.

मिथुन

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. तात्पुरत्या स्वरुपाची गुंतवणूक शेअर्समध्ये करता येईल. नोकरी मिळेल. मागील येणे वसूल करा. रविवार, सोमवार कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. नवीन परिचयातून व्यवसायाला नवे वळण मिळेल. लोकांच्या उपयोगी पडा. संसारात सुखद समाचार मिळेल.

कर्क

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. कायदा मोडू नका. धंद्यात फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामावर वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा वाढेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. संसारातील समस्या कमी होईल. प्रकृती सुधारेल. कला, साहित्यात प्रगती कराल.

सिंह

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात हिशोब नीट करा. संसारात वादविवाद  जास्त वाढवू नका. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत महत्त्वाचा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळच्या लोकांना नाराज करू नका. विरोधक मैत्री करण्यास येतील.

कन्या

या सप्ताहात कर्केत शुक्र, तुमच्या राशीत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. अरेरावी मात्र करू नका. नोकरीत तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात दादागिरी नको. तुमचा मुद्दा प्रभावी असला तरी त्याला महत्त्व मिळणे कठीण आहे. वादविवादात सरशी होईल. हायब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नम्रता ठेवा.

तुळ

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात सावधपणे बोला. वसुली करा. शुक्रवार, शनिवार रागावर ताबा ठेवा. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. वरि÷ खूष होतील. बेकारांनी नोकरीचा प्रयत्न करावा. राजकीय, सामाजिक कार्यात कोणतेही विधान करताना बेसावध राहू नका. प्रवासात घाई नको संसारात आनंदाची घटना घडेल. कला, साहित्य शिक्षणात प्रगती कराल.

वृश्चिक

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी क्षुल्लक तणाव होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. जुने येणे वसूल करा. चर्चा यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेता येईल. विरोधकांना गप्प कराल. नोकरीत तुमच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. कुटुंबातील गैरसमज कमी करता येईल.

धनु

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात किरकोळ समस्या येईल. मोठे काम मिळवता येईल. मोहाला आवर घाला. नोकरीत वरि÷ांची मर्जी संपादन कराल. राजकीय, सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. प्रति÷ा मिळेल. भाषण प्रभावी होईल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. संसारात दुर्लक्ष नको, साहित्य-शिक्षणात प्रगती करता येईल.

मकर

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. नवीन व्यक्तीची ओळख होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव चांगला पडेल. अहंकार दाखवू नका. धंद्यात नवी संधी मिळेल. नोकरी टिकवता येईल. रागावर लगाम लावा. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रपणे तुमचा विचार मांडा. प्रवासात घाई नको. अनुभवी व्यक्तीचा आदर करा. कला, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या.

कुंभ

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात दूरदृष्टिकोन ठेवा. मोहाला बळी पडू नका. नोकरीत तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. इतरांना मदत कराल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या बोलण्यावर वादंग होईल. शत्रू, मित्र यांच्यात गल्लत होऊ देऊ नका. मान, प्रति÷ा वाढवणारी घटना साहित्य क्षेत्रात घडेल. स्वत:च्या खाण्या- पिण्याची काळजी घ्या. संसारात क्षुल्लक मतभेद होईल.

मीन

या सप्ताहात कर्केत शुक्र, कन्येत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यातील परिस्थिती सुधारता येईल. प्रसंगानुरुप वागा. खर्च वाढेल. नोकरीत काम वाढेल. अनंतचतुर्दशीच्या दिवशी कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात दादागिरीचे वक्तव्य, टिकात्मक ठरेल. प्रति÷ा सांभाळा. कुटुंबात वृद्ध माणसाला जपा. कला क्षेत्रात विशेष यश मिळवता येईल.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 फेब्रुवारी 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशीभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य सोमवार दि. 9 मार्च 2020

tarunbharat

राशिभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 एप्रिल 2021

Patil_p
error: Content is protected !!