तरुण भारत

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचे दिवसात 69 रुग्ण

विटा शहरात दिवसभरात बधितांचे अर्धशतक पुर्ण

प्रतिनिधी / विटा

खानापूर तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी विटा शहरात एका दिवसात तब्बल 54 रुग्णांची भर पडली. तालुक्यात शनिवारी 69 रुग्ण वाढले. तालुक्यातील कोरोना बधितांच्या संख्येने 379 चा आकडा गाठला. यामुळे विट्यासह तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.

दिवसेंदिवस खानापूर तालुक्याभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने शनिवारी 379 चा आकडा गाठला. यापैकी 118 रुग्ण बरे झाले आहेत. 12 जणांचा कोरोने मृत्यु झाला. तर 249 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसात अँटिजेन टेस्ट वाढवल्या आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 216 रुग्ण अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकट्या विट्यात 192 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत.

शनिवारी कोरोनाचा खानापूर तालुक्यात अक्षरशः भडका उडाला. दिवसभरात विटा शहरात तब्बल 54 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यामध्ये 31 पुरुष व 23 महिलांचा समावेश आहे. भाळवणी येथे 2, नागेवाडी 2, बलवडी येथे 2, घानवड येथे 1 , ढवळेश्वर येथे 1, गार्डी येथे 1, कुर्ली येथे 2, लेंगरे येथे 2, धोंडेवाडी येथे 1 असे तालुक्यात एकूण तब्बल 69 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.

एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत खळबळ पसरली. विटा शहराच्या सर्वच भागात रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यातही बधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनासमोर देखील आव्हान उभा राहिले आहे. विट्यात नगरपालिका, तहसीलदार, प्रांताधिकारी, आरोग्य विभाग, सामाजिक संघटना, डॉक्टर संघटना यांच्या तातडीच्या बैठका झाल्या. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोशल डिस्टनसिंग, मास्क आदी नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरातून बाहेर पडावे, असे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले.

Related Stories

सांगली : शेतकऱ्यांला बांधापर्यंत पाणी देण्याचा प्रयत्नशील

Abhijeet Shinde

सांगली : वारणा धरणात 31.38 टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

सांगली : ‘या’ गावातील भाजप महिला कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Abhijeet Shinde

सांगली : ओबीसींच्या प्रलंबित योजना मार्गी लावा, अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde

सांगली जिल्हात 39 रूग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू

Abhijeet Shinde

सौदे बंद, ९० हजार टन बेदाणा पडून!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!