तरुण भारत

पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

एक सैनिक हुतात्मा : 24 तासांत 7 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisements

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील जदुरा भागात सुरक्षा दलांनी शनिवारी पहाटे 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत एका सैनिकाला हौतात्म्य पत्करावे लागले आहे. चकमक स्थळावरून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मृत दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. संबंधित भागात अजून एक दहशतवादी लपून बसल्याचा संशय असल्याने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी दुपारी सुरक्षा दलांनी शोपियांच्या किलूरा भागात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर एकाला अटक केली होती. शोपियांमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने दिलेल्या माहितीच्या आधारावरच शुक्रवारी रात्री उशिरा जदूरा येथे शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. सुरक्षा दल पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले आहेत.

17 आणि 18 ऑगस्ट रोजी बारामुल्लाच्या करीरी भागात चकमक झाली होती. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यात लष्कर-ए-तोयबाचे दोन कमांडर सज्जाद उर्फ हैदर आणि उस्मान यांचा समावेश होता. हैदर हा बांदीपोरा येथील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. तो तरुणांची दिशाभूल करत त्यांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेत होता. विदेशी दहशतवादी उस्मानने वसीम बारी, त्याचे वडिल आणि भावाची हत्या केली होती.

19 ऑगस्ट रोजी दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान दोन चकमकी झाल्या होत्या. या चकमकींमध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. त्याचदिवशी हंदवाडाच्या गनीपोरामध्ये दोन दहशतवादी मारले गेले होते. 28 ऑगस्ट रोजी शोपियांच्या किलूरा भागात सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केले होते तर एकाला अटक केली होती. हे सर्वजण अल बद्र दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. दहशतवाद्यांकडून दोन एके-47 आणि 3 पिस्टल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. मागील 2 आठवडय़ांमध्ये काश्मीरमध्ये 10 दहशतवादी मारले गेले आहेत.

Related Stories

वाळवंटापासून कच्छच्या रणापर्यंत युद्धसराव

Patil_p

अजमेर बॉम्बस्फोटातील आरोपी ‘डॉ. बॉम्ब’ फरार

prashant_c

दहशतवाद्यांकडून लपण्यासाठी बंकर्सचा आधार

Patil_p

शिवराजसिंह-कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांच्या धडकेचे वृत्त खोटे

datta jadhav

भिकाऱ्यांचे भाग्य बदलणारा दाता

Patil_p

गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!