तरुण भारत

घातपाताची धमकी : बेंगळुरात सुरक्षेत वाढ

केंद्रीय गुप्तचर विभागाकडून सतर्कतेच्या सूचना : रेल्वे स्थानक, विमानतळावर कडक बंदोबस्त

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीने बॉम्बस्फोट घडविण्यात येईल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने ट्वीटरवर दिल्याने बेंगळूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने राज्य पोलीस दलाला सतर्कतेची सूचना दिल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस प्रमुख, रेल्वे आणि विमानतळांवरील सुरक्षा तुकडय़ांना केंद्रीय गुप्तचर विभागाने तातडीचा संदेश पाठवून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची सूचना दिली आहे. केरळच्या काकीनाडा येथील केव्हीसीचे सीईओ आणि संस्थापक असणाऱया व्यक्तीच्या ट्वीटर अकाऊंटवरून धमकीचा ट्विट करण्यात आला आहे. ‘आपण बेंगळूरला भेट देत आहे. बेंगळूर मेट्रो रेल्वे आणि यशवंतपूर रेल्वे स्थानकावर आठवडाभरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा. आयएसआयएसच्या मदतीने बॉम्बस्फोट घडवून विमाने आणि रेल्वे जाळून नष्ट करेन’, असे ट्विट करण्यात आले आहे. ही बाब निदर्शनास येताच गुप्तचर विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सदर ट्वीटर अकाऊंट बोगस आहे की हॅक करण्यात आले आहे, याचा तपासही केला जात आहे.

यशवंतपूर, सेंट्रल रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि संवेदनशील भागात सुरक्षा वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तालय कार्यकक्षेत अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात आली आहे. संवेदनशील भाग असलेल्या बेंगळूरमधील पूर्व आणि पश्चिम भागात पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच गस्त वाढविली आहे. जलद कृती दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत.

बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी, के. जे. हळ्ळी आणि कावलभैरसंद्र येथील हिंसाचार प्रकरणात देखील आयएस संघटनेचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून समजले आहे. अशा परिस्थितीत धमकीचा ट्वीट करण्यात आल्याने हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी आणि त्यांची भेट घेणाऱया प्रत्येकावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये शाळा-कॉलेज बंद

Patil_p

दिल्लीत देशातील पहिली प्लाझ्मा बँक सुरू होणार

Patil_p

देशवासियांना मिळणार आरोग्य ओळखपत्र

Patil_p

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्याप स्थिर

Patil_p

“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागा जिंकू शकत नाही”

Abhijeet Shinde

दिल्लीत 20 जूनपर्यंत मिळणार ‘स्पुटनिक व्ही’: अरविंद केजरीवाल

Rohan_P
error: Content is protected !!