तरुण भारत

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जागतिक बुद्धिबळ संघटना – फिडे यांनी आयोजित केलेल्या जागतिक  ऑनलाईन ऑलिम्पियाडच्या फायनल मध्ये भारतीय संघाने धडक मारली असून या पहिल्यावहिल्या जागतिक स्पर्धेत आपले पदक निश्चित केले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या नियमावलीमुळे सध्या कला-क्रीडा क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने नवनवीन अभिनव प्रयोग केले जात आहेत.

Advertisements

जागतिक बुद्धिबळ संघटनेने सुद्धा पुढाकार घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले असून स्पर्धेत तब्बल 160 हून अधिक देशांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक देशातील खेळाडूंच्या गुणांकनानुसार स्पर्धेत एकूण 5 गट करण्यात आले आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकचा विदिथ गुजराथी करत असून श्रीनाथ नारायणन उपकप्तानपद आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळत आहे.

पाच वेळा जगज्जेता झालेला भारताचा विश्वनाथन आनंद, विदिथ गुजराथी, पी हरिकृष्णा, अरविंद चिदंबरम हे अनुभवी तर निहाल सारीन आणि आर. प्रग्यानंदा यांच्यासारख्या युवा ग्रँडमास्टर्सच्या जोडीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, भक्ती कुलकर्णी यांच्यासारख्या अनुभवी महिला खेळाडू आणि दिव्या देशमुख, आर. वैशाली, वन्तिका अग्रवाल यांच्यासारख्या युवा महिला खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व स्पर्धेत करत आहेत.

सोहनी यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या स्पर्धेत उप-उपांत्य फेरीत अर्मेनियाविरुद्ध झालेल्या लढतीतील नाटय़मय घडामोड आणि उपांत्य फेरीत सुद्धा पहिला डाव हरून मग बरोबरी साधल्यावर टायब्रेकर डाव जिंकून अंतिम फेरीत धडक मारल्याने भारतीय संघाचे मनोधर्य उंचावले असल्याचे आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी यांनी सांगितले.

Related Stories

आयटीआयसाठी ऑनलाईन परीक्षा नको

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीचा खून करणाऱया नराधमांना फाशी द्या

Patil_p

दहावीचा निकाल उंचावण्यासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

बेळगाव-कोल्हापूर बससेवेवर आठ दिवसांपासून परिणाम

Amit Kulkarni

गोवा एक्स्प्रेस धावणार लोंढय़ापर्यंतच

Patil_p

कबड्डी : भारत पेट्रोलियमचा मुंबई पोलिसवर १५ गुणांनी विजय

triratna
error: Content is protected !!