तरुण भारत

स्पर्धेतून रैनाची माघार, आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था/ दुबई

चेन्नई सुपरकिंग्स संघातील 13 सदस्य पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते, त्यात आणखी एका भारतीय खेळाडूचा समावेश असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. यामुळे, या संघातील कोरोनाबाधित खेळाडूंची संख्या दोनवर पोहोचली. दरम्यान, या संघातील स्टार डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव पूर्ण हंगामातून माघार घेतली.

Advertisements

ज्या भारतीय खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याचा अलीकडेच भारत अ संघात समावेश होता. शिवाय, रणजी क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणे अपेक्षित असून अद्याप त्याची रुपरेषा जाहीर होणे बाकी आहे.

आतापर्यंत दि. 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत एकूण 1988 जणांची कोरोना चाचणी घेतली असल्याची माहिती भारतीय क्रिकेट मंडळाने दिली आहे. यात 2 खेळाडूंसह 13 सदस्य पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी नमूद केले. या 13 सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. पण, यात दोन खेळाडू असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. दरम्यान, पथकातील 13 सदस्य पॉझिटिव्ह असले तरी यामुळे प्रत्यक्ष स्पर्धेत अडचण येणार नाही, असा दावा चेन्नई सुपरकिंग्सच्या पदाधिकाऱयांनी केला आहे.

नातेवाईकाचा खून झाल्याने माघार

दरम्यान, भारतात एका नातेवाईकाचा खून झाल्याने रैनाने माघार घेतली असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. 58 वर्षीय अशोक कुमार असे त्यांचे नाव असून घरावर दरोडा टाकत अज्ञातांनी त्यांचा खून केला व या घटनेत कुटुंबातील आणखी 4 सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

एटीके-बगानच्या जर्सीमध्ये बदल नाही

Patil_p

राजस्थानचा केकेआरविरुद्ध ‘रॉयल’ विजय

Patil_p

1500 मी.इनडोअर शर्यतीत गुडाफ त्सेगेचा नवा विश्वविक्रम

Patil_p

गुरप्रीत सिंग विजेता

Patil_p

नवे सचिव भरत सिंग चौहान यांचा सत्कार

Patil_p

स्टेडियम तर रिकामे…मग तो आवाज येतो कुठून?

Patil_p
error: Content is protected !!