तरुण भारत

श्रीनगरमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 पोलीस शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत  तीन  दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईदरम्यान जम्मू-काश्मीरचे पोलीस एएसआय बाबू राम शहीद झाले.

Advertisements

श्रीनगर येथील पंथा चौकात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि श्रीनगर पोलिसांच्या संयुक्त चेक नाक्यावर गोळीबार केला. त्यानंतर सर्च मोहीम राबविण्यात आली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला. त्यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला जवान आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर एक पोलीस शहीद झाला. 

या भागात सुरक्षा दलाकडून अजूनही सर्च मोहीम सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील झादुरा भागात झालेल्या चकमकीतही तीन जवानांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.

Related Stories

चिंता वाढली : देशात गेल्या 24 तासात 12881 नवे कोरोना रुग्ण; 334 जणांचा मृत्यू

Rohan_P

मल्ल्याची कोटय़वधीची मालमत्ता फ्रान्समध्ये जप्त

Patil_p

ब्रिटनहून भारतात आलेल्या 6 जणांमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन

datta jadhav

लसीकरणात भारत तिसऱया क्रमांकावर

Patil_p

दिलासा! मुंबईतील उद्याने, चौपाट्यांबाबत पालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

कोरोना : पंजाबमध्ये मागील 24 तासात 8,174 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P
error: Content is protected !!