तरुण भारत

गोकुळ शिरगावने उमदा बॉक्सिंगपट्टू गमावला

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

गोकुळ शिरगाव( तालुका) करवीर येथील बॉक्सिंग पट्टू असलेला खेळाडू गौरव म्हाकवे याने आपल्या जीवनातून अचानक एक्झिट घेतल्याने गोकुळ शिरगाव परिसरात तरुण वर्गामध्ये शोककळा पसरली आहे.

गौरव धनाजी महाकवे (वय 18 )याचे आज रविवारी सकाळच्या सुमारास शरीरातील साखर अचानक वाढल्याने त्याला त्रास जाणवू लागला. त्याला खासगी दवाखान्यात नेले असता संध्याकाळी चारच्या सुमारास त्याला या त्रासातून चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तो लहानपणापासूनच खेळामध्ये जास्त असल्याने गेल्या दोन वर्षापासून त्याने तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर. राज्यस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत खेळून चांगले नाव करून त्याने बऱ्याच ठिकाणी प्रशस्तीपत्र व शिल्ड मिळवून आणले होते.

गौरव याचा चेहरा सतत हसरा असल्यामुळे व लोकांच्या बरोबर गोड बोलणे राहिल्याने त्याचा मित्र परिवारही मोठा होता. आज अचानक त्याचा मृत्यू झाल्याने गोकुळ शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,

Related Stories

कोल्हापूर : उचगाव महामार्गालगत पार्क केलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरट्याने केल्या लंपास

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

बहिरेवाडी येथे तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वारणा समूहातील जेष्ठ कार्यकर्ते विष्णू बच्चे यांचे निधन

Abhijeet Shinde

गंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आरोग्य यंत्रणा हतलब, रूग्ण बेदखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!