तरुण भारत

पर्यटन व तिर्थक्षेत्र तसेच जिल्हाबंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

संपुर्ण जगात सध्या कोरोनाचा थैमान सुरु आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेतच. तसेच टप्प्या टप्प्याने स्क अनलॉक देखील सुरु करण्यात येत आहे. परंतू पर्यटन खुले करण्याबाबत अद्याप शासनाने कोणतेही ठोस भूमिका मांडली नाही. तरी, पर्यटन व तिर्थक्षेत्र तसेच जिल्हाबंदीबाबत आता शासनाने योग्य निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे.

           महाबळेश्वर तालुका गेल्या सहा महिन्यांपासून संपुर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. येथील सर्वच आर्थिक व्यवहार संपुर्णपणे पर्यटकांवर अवलंबून असून देखील सहा महिन्यात एकाही पर्यटकाला येथे प्रवेश दिला गेला नाही. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गेली सहा महिने कोविडच्या र्पाश्र्वभूमीवर बंदचा निर्णय घेतला होता. शासनाला सर्वोतोपरी सहकार्य येथील नागरिकांनी केले. 

कालांतराने शासनाने टप्प्या टप्प्याने अनलॉक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. ठराविक दुकाने सुरू देखील करण्यात आली. अनेक शहरात व गावांमध्ये अनलॉक मुळे व्यवहार काही प्रमाणात सुरु झाले. परंतू महाबळेश्वर पाचगणी सारख्या संपूर्ण पणे पर्यटकांवर अवलंबून असणाया शहरांना त्याचा कोणताही फायदा झाला नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून महाबळेश्वर तालुक्यातील नागरिक, व्यावसायिक व शेतकयांचा दैनंदिन खर्च, येथील मुसळधार कोसळणाया पावसामुळे घर व त्याची आवश्यक डागडूजी चा खर्च कमी नाही. तरीही सहा महिने येथील सर्वांनी शासनाचे सर्व नियम पाळत व्यवस्थित रित्या सांभाळले आहेत. परंतू आता येथील नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. आता रोजच्या दैनंदिन गरजा भागविणे अशक्य व अवघड होऊ लागले आहे.

वास्तविक पर्यटनस्थळांवरील खरी भिस्त उन्हाळी हंगामातील सुट्टी मध्ये होत असते त्यामुळे पावसाळी हंगामातील आर्थिक व्वस्थेची चिंता मिटत असे परंतू यावेळी कोविड 19 मुळे यावर्षी मुख्य व्यवसाय अगोदरच सर्वत्र बंद झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक विवंचनेची झळ सोसावी लागत आहे. तसेच भविष्यात देखील व्यवसाय सुरू करताना आर्थिक मदतीची अत्यंत गरज भासणार आहे. तसेच सलग सहा महिने बंद पडलेली उपकरणे सुरू करताना कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाला देखील विचार करुन पर्यटनस्थळांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे लागणार आहेत.

सातारा जिह्यातील सर्वच पर्यटनस्थळ व तिर्थक्षेत्र टप्प्या टप्प्याने सुरु करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येथील नागरिकांना आर्थिक संकटाबरोबर मानसिक आधार मिळण्यास मदत होईल. त्यामुळे पर्यटनक्षेत्रावरील जनजीवन सुरळीत करण्यासाठी जिल्हाबंदी उठवून पर्यटनस्थळ सुरु करण्यासाठी शासनाने पाऊले उचलावीत अशी मागणी शहरातून कोर धरू लागली आहे .

Related Stories

पालिकेच्या आरोग्य विभागाची घडी विस्कटली

Patil_p

पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कार्यालय हलवा

triratna

साताऱयातील तेराशे कामगारांसह रेल्वे रवाना

Patil_p

शहरात बांधकामांना नवीन वर्षात येवू लागली उर्जित अवस्था

Patil_p

नृसिंहवाडी कुरुंदवाड परिसरात आषाढी एकादशी साजरी

triratna

लॉकडाऊममध्ये शुक्रवार पेठेत होतेय वृक्ष तोड

Patil_p
error: Content is protected !!