तरुण भारत

झोपलेल्या पत्नीचे डोके आपटून खून

मलकापुरातील घटना, संशयित पती ताब्यात

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

मलकापूर (ता. कराड) येथे महिलेचा डोक्यात वार करून निर्घृण खून झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. कौटुंबिक वादातून पतीनेच खून केल्याची फिर्याद शहर पोलिसांत दाखल झाली आहे. मंगल दाजी येडगे (वय 48, रा. मेनरोड, आदिवासी आश्रम शाळेसमोर, मलकापूर, ता. कराड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयिताकडे कसून चौकशी केली. खून प्रकरणी मृत महिलेचा पती दाजी आनंदा येडगे (वय 54) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेचा भाऊ विलास महादेव सोनके (वय 64, रा. सरस्वती संकुल, कन्याशाळेजवळ मलकापूर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

 पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगल दाजी येडगे व दाजी आनंदा येडगे यांना एक मुलगा व तीन विवाहीत मुली आहेत. येडगे दाम्पत्य मुलगा अनिकेतसह आदिवासी वसतिगृहाजवळ घरात वास्तव्यास आहेत. मंगल येडगे गृहिणी आहेत, तर पती दाजी येडगे शेती करतात. मृत मंगल येडगे व पती दाजी येडगे यांच्यात वारंवार भांडण होत होते. त्यांचा मुलगा अनिकेत याने मामाला हा प्रकार पाच दिवसांपूर्वी सांगितला होता. मंगल येडगे यांच्या भावांसह नातेवाईकांनी पती- पत्नीला समजावले होते.

दरम्यान, रविवारी पहाटे पुन्हा त्यांच्यात भांडण झाल्याचे मुलगा अनिकेतने ऐकले होते. तो घरातच हॉलमध्ये झोपला होता. सकाळी दोघेही बेडरूममधून बाहेर न आल्याने अनिकेतने पाहिले असता मंगल येडगे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. झोपलेल्या अवस्थेतच त्यांचा खून झाल्याचे दिसत होते. त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. मंगल यांचे पती तेथे दिसत नव्हते. रविवारी पहाटेच्या भांडणानंतर हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. अनिकेतने मित्राला हा प्रकार सांगितला. त्या मित्राने येडगे यांच्या इतर नातेवाईकांना ही घटना सांगितली. मंगल यांचे बंधू विलास सोनके, त्यांची पत्नी घटनास्थळाकडे धावले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक सराटे, उपनिरीक्षक भरत पाटील, हवालदार सागर बर्गे, सौरभ कांबळे, सुनील पन्हाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मंगल येडगे यांचा डोके आपटून निर्घृण खून झाल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून स्पष्ट झाले. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. मंगल येडगे यांचा खून कौटुंबिक वादातून झाला असावा, अशी शक्यता समोर आली.

दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पाच दिवसांपूर्वीच समजावले होते

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत मंगल येडगे व पती दाजी येडगे यांच्यात वारंवार भांडण होत होते. हा प्रकार समजल्यावर मंगल यांच्या मोठय़ा भावाने दोघा पती पत्नीला समजावून सांगितले होते. मात्र त्यांच्यातील वाद सुरुच होता. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे पाच वाजताही त्यांच्यात भांडण झाल्याचे मुलगा अनिकेतने ऐकले होते. मात्र पती-पत्नीचे भांडण या टप्प्यावर गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. याची नोंद फिर्यादीतही घेण्यात आली आहे. 

पहाटे खून झाल्याने खळबळ

मलकापुरात कोरोनाचा कहर सुरू असून अहिल्यानगर परिसरात रुग्ण सापडले आहेत. याच परिसरात रविवारी निर्घृण खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली. खुनाच्या घटनेनंतर संशयित तेथून महामार्गाच्या दिशेने गेला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे दिवसभर चौकशी सुरू होती.

Related Stories

सातारा नगरपालिका आणि झेडपी कोरोनाच्या विळख्यात

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता : उद्धव ठाकरे

Rohan_P

सोलापूर शहरात आज ८४ पॉझिटीव्ह तर ५ मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करा

Abhijeet Shinde

नगरसेवक अमोल मोहिते यांच्याकडून प्लाझ्मा दान

Patil_p

मुंबई, पुण्याच्या चित्रपट निर्मात्यांना रेड कार्पेट नको

Abhijeet Shinde
error: Content is protected !!