तरुण भारत

द. गो. जिल्हा रुग्णालयाचे दोन मजले कोविडसाठी वापरात आणावेत

प्रतिनिधी/मडगाव

दक्षिण गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे आणि रुग्णांच्या योग्य वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सध्याची परिस्थिती अभूतपूर्व प्रमाणातील आपत्तीकडे येत आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण कोविडसाठी उपलब्ध खाटांपैकी ईएसआय इस्पितळ किंवा मडगाव आणि आसपासच्या खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा इस्पितळातील दोन मजले वापरात आणण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी उचलून धरली आहे.

Advertisements

आमदार सरदेसाई यांनी यासंदर्भात एक पत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना रविवारी पाठविले आहे. त्यात वरील मागणी करण्यात आली आहे. सर्व राजकीय अतिमहनीय व्यक्ती आणि अगदी आरोग्य सेवा संचालकांनी खासगी रुग्णालयात उपचारांची मागणी केली. ही वस्तुस्थिती सरकारची तत्परता, क्षमता आणि गुणवत्ता यावर खेदजनक टिपणी आहे, असे त्यात नमूद केले आहे. अशा परिस्थितीत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दोन संपूर्ण मजल्यांना कोविड निगाविषयक पायाभूत सुविधांच्या कक्षेतून बाहेर ठेवणे पूर्णपणे गुन्हेगारी कृत्य आहे. विशेषत: सर्वसामान्य गोमंतकीयांना या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी अशा सुविधांची नितांत आवश्यकता आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

लोक तडजोड सहन करणार नाहीत

काहीही झाले, तरी हे रुग्णालय 800 खाटांचे पूर्ण विकसित जिल्हा रुग्णालय आहे आणि संपूर्ण दक्षिण गोव्याच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच त्याची योजना आखण्यात आली होती. येथे पुरविल्या जाणाऱया आरोग्य सेवांच्या क्षमता किंवा गुणवत्तेत कोणतीही तडजोड दक्षिण गोव्यातील लोक सहन करणार नाहीत. यापूर्वी नर्सिंग हॉस्पिटलसाठी जागा आरक्षित करण्याविषयी चर्चा होती. त्याला लोकांनी आक्षेप घेतला होता. आपण नियोजित 800 खाटांपैकी एक खाटही कमी करण्यास विरोध दर्शविला होता, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.

इस्पितळासाठी फातोर्डावासियांचा त्याग

आपण फातोर्डा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो आणि आपल्या मतदारांनी या इस्पितळ प्रकल्पासाठी त्यांच्या भूमीचा त्याग केला आहे. हे लक्षात घेता, दक्षिण गोव्यातील नागरिकांच्या आरोग्याची शक्मय तितकी चांगली काळजी घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या त्यागाची कदर करणे आपले कर्तव्य आहे. त्यांना रुग्णालयात कायमस्वरूपी नोकऱया देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कोविड रोगराई संपल्यानंतर याची दखल घ्यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

दोन मजल्यांसाठी एजन्सींना नियुक्त करा

पण आता जागेची आणि सुविधांची गरज अत्यंत गंभीर असताना कोविड रुग्णांच्या देखभालीसाठी किमान 250 खाटा बसू शकतील अशा 2 मजल्यांना सुसज्ज करण्यासाठी आवश्यक त्या एजन्सीना नियुक्त करून हे मजले त्वरित कोविड रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे सरदेसाई यांनी या पत्रातून आरोग्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले आहे.

रुग्णालयासाठी निधी का मिळू शकत नाही ?

शेजारील महाराष्ट्र राज्याने नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचा वरळी येथील प्रति÷ित जंबो डोम 1000 खाटांच्या कोविड सुविधेसाठी उपलब्ध करून दिला आहे. तेव्हा गोवा सरकार मात्र आपले इस्पितळ सेवेसाठी उपलब्ध करता येत नसल्याने आपल्या नागरिकांना मरू देत आहे ही लज्जास्पद बाब आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. जेव्हा पंतप्रधान केअर फंडमधून बिहारमधील 500 खाटा असलेल्या कोविड रुग्णालयास अर्थसाहाय्य दिले जाणार आहे तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या सरकारला संपूर्ण जिह्याकरिता 800 खाटांचे पूर्ण रुग्णालय उभारण्यासाठी निधी का मिळू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

Related Stories

शापोरा येथील मच्छीमारांना सहकार्य करण्याची मागणी

Omkar B

पेडणे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सुवर्णमहोत्सवात पदार्पण साधेपणाने व सरकारी नियम पाळून 11 दिवस साजरा होणार

Omkar B

माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे निधन

Amit Kulkarni

जनता भाजपला 13 वरुन शून्यावर आणल्याशिवाय राहणार नाही

Amit Kulkarni

माशेल भागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

भरमसाठ वीजबिलाविरोधात काँग्रेसची सोशलमीडिया चळवळ

Omkar B
error: Content is protected !!