तरुण भारत

गौरव आर्य आज ‘इडी’समोर हजर राहणार

प्रतिनिधी/ पणजी

 चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात रिया चक्रवर्ती हिच्याशी वॉट्सऍप चॅटमधून ड्रग्स संदर्भात चर्चेत आलेला गोव्यातील हॉटेल उद्योजक गौरव आर्य याने 2017 नंतर आपला रिया चक्रवर्ती सोबत कोणताच संपर्क आलेला नाही. आपण सुशांतसिंह राजपुतला ओळखत नसून या प्रकरणात आपल्याला का गोवण्यात आले हेच कळत नसल्याचा दावा त्याने केला आहे.

Advertisements

अंमलबजावणी संचालनालयाने गौरव आर्य याला समन्स बजवून 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील कार्यालयात उलट तपासणीसाठी हजर राहाण्याचे बजाविले होते. त्यानुसार गौरव आर्य काल रविवारी गोव्यातून मुंबईला रवाना झाला आहे. रविवारी दुपारी गौरव आर्य मुंबईला जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर पोचल्याचे कळताच पत्रकारांनी त्याला गाठले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्याने वरील दावा केला आहे.

राजपूत मृत्यूप्रकरणात हणजूण येथील द टॅमरिंड रिसॉर्टचे नाव चर्चेत येत आले असून ते रिसॉर्ट ड्रग्स प्रकरणात अमंलबजावणी संचालनालय व एनसीबीच्या स्पॅनरखाली असलेले गौरव आर्य याच्या मालकीचे आहे. रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्य यांचे अमलीपदार्थ विषयक चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने आर्य याला चौकशीच्या स्पॅनरखाली आणले आहे. आर्य याच्या मालमत्तेबाबत अंमलबजावणी संचालनालयाला संशय आहे.

एनसीबी तसेच अमंलबजावणी संचालनालयाचे अधिकारी गोव्यात येऊन गेले होते, मात्र त्यांना गौरव आर्य भेटला नव्हता. अखेर अमंलबजावणी संचालनालयाने आर्य याच्या हॉटेलच्या दारावर समन्स नोटीस चिकटवली होती. 31 रोजी चौकशीला हजर न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बजावले आहे. त्यानुसार तो मुंबईला रवाना झाला आहे.

कर्नाटकातील एक आमदारही

तपासयंत्रणेच्या रडारखाली

कर्नाटकातील एक आमदारही या ड्रग्ज प्रकरणात तपास यंत्रणेच्या रडारखाली आला आहे. तो ‘द टॅमरिंड रिसॉर्ट’मध्ये गौरव आर्य याचा पार्टनर असल्याने हे कनेक्शन जोडले गेले असल्याची माहिती मिळाली आहे. हा आमदार कोण आहे याची उत्सुकता आहे. तपासानंतरच हे स्पष्ट होणार होईल.

Related Stories

भाजप सरकारने गोव्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली

Amit Kulkarni

एटीके बागान-चेन्नईन एफसी लढत आज फातोडर्य़ात रंगणार

Amit Kulkarni

वास्को शहर व परीसरात लॉकडाऊनला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद, शहरात तुरळक वर्दळ

Amit Kulkarni

फोंडा तालुक्यात ऑनलाईन योग साधना

Amit Kulkarni

कोरोनाचा कहर : सहाजणांचा मृत्यू

Patil_p

कोरोना पॉझिटिव्ह 607

Omkar B
error: Content is protected !!